Friday, April 19, 2024
घरमानिनीमायक्रोवेव्ह मध्ये चुकूनही गरम करू नका 'हे' foods

मायक्रोवेव्ह मध्ये चुकूनही गरम करू नका ‘हे’ foods

Subscribe

सध्याच्या बदलत्या काळात मायक्रोवेवचा वापर बहुतांश घरात अगदी सहज केला जातो. परंतु काही लोकांना हे माहिती नसते की, त्यामध्ये नक्की कोणते पदार्थ गरम करावेत अथवा करु नयेत. अशातच तुम्ही सुद्धा दररोज कोणतेही पदार्थ गरम करण्यासाठी मायक्रोवेवचा वापर करता का? कारण याचा वापर करणे सध्या अगदी सोप्पे झाला आहे. त्यामुळे स्मार्ट उपकरणांच्या माध्यमातून अन्न गरम करण्यासह कुकिंग अथवा बेकिंग ही केले जाते. पण याचा वापर करताना फार सावधगिरी बाळणे अत्यंत गरजेचे आहे. असे काही पदार्थ आहेत जे तुम्ही माइक्रोवेवमध्ये गरम केल्यास तर त्याचा स्फोट होऊ शकतो. तर पाहूयात असे कोणते पदार्थ आहेत जे मायक्रोवेवमध्ये चुकूनही गरम करु नयेत.

boiled eggs
boiled eggs

-अंड
मायक्रोवेवमध्ये उकडलेले अंड किंवा अंड्याचे कवच न काढलेले अंड सुद्धा ठेवण्याची चूक करु नका. कारण अंड हे त्याच्या कवचासह ठेवल्यास स्फोट होण्याची अधिक शक्यता असते. अथवा मायक्रोवेवचे नुकसान सुद्धा होऊ शकते.

- Advertisement -
tomato ketchup
tomato ketchup

-टोमॅटो सॉस
टोमॅटो सॉस मायक्रोवेव ओवनमध्ये ठेवल्यास विस्फोट अथवा वीजेचा धक्का लागण्याची शक्यता असते. खरंतर टोमॅटो सॉसला गरम करण्यासाठी लागणारे तामपान हे सर्वसामान्यपणे अधिक असते. ज्यामुळे वाफ निर्माण होते आणि जर तो अधिकच गरम झाल्यास फुटण्याची भीती असते.

water in glass
water in glass

पाणी
काही लोकांना मायक्रोवेव मध्ये पाणी गरम करणे अगदी सोप्पे वाटते. कारण यामध्ये पाणी लवकर गरम होते असा समज बहुतांशजणांचा असतो. परंतु असे करणे कधी कधी धोकादायक ठरु शकते. कारण पाणी गरम करताना त्यामधून बुडबुडे येत नाहीत. ज्यामुळे ते अधिक उकळले गेल्यास स्फोट होण्याची शक्यता असते.

- Advertisement -
mirchies
mirchies

-मिर्ची
मिर्ची मध्ये Capsaician नावाचा पदार्थ असतो. जे अतिशय तिखट असतो. मायक्रोवच्या आतमध्ये मिर्ची गरम केल्यास तर अधिक वाफ आतमध्ये निर्माण होते. याच्या दाबाने काहीवेळेस मायक्रोवेवचे दरवाजा उघडण्यास ही समस्या निर्माण होऊ शकते.

processed meat
processed meat

-प्रोसेस्ड मीट
बेकन, हॉट डॉग, लंच मीट आणि सॉसेजेस हे गॅसवर बहुतांशवेळा शिजवले जाता. पण मायक्रोवेवमध्ये तसे करण्याची चुक कधीच करु नका कारण या प्रोसेस्ड मीट फूड्सला गरम केल्यास कोलेस्ट्रॉल ऑक्सीकरण उत्पादांची निर्मिती होते. ज्यामुळे सूज येणे, रक्तवाहिन्या ब्लॉक होणे अशा प्रकारच्या आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात.

तर वरील काही गोष्टी लक्षात घेता तुम्ही सु्द्धा मायक्रोवेव मध्ये असे फूड्स गरम करत असल्यास ही चुक यापुढे करमे टाळा. जेणेकरुन एखादी दुर्घटना होण्यापासून तुमचा बचाव होईलच पण आरोग्यासंबंधित समस्या सुद्धा उद्भवणार नाहीत.

 

 


हेही वाचा : Iron Cleaning Hacks : इस्त्रीवर गंज चढलाय? मग करा ‘हे’ उपाय

- Advertisment -

Manini