हिवाळ्यात थंडी जास्त असल्यामुळे आपल्याला सहसा तहान लागत नाही त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. उन्हाळ्यातच नाही तर हिवाळ्यात देखील आपलं शरीर हायड्रेट असणं अत्यंत गरजेचं आहे. पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने आपल्याला अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. भरपूर किंवा प्रमाणात पाणी प्यायल्याने आपल्याला कोणतेही आजार होत नाही आपलं शरीर सुदृढ देखील राहते. या दिवसात तहान कमी लागल्यामुळे आपण फार पाणी पित नाही परंतु तुम्हाला माहित आहे का ? तुम्ही अशा काही पदार्थांचं सेवन करू शकता ज्यामध्ये भरपूर पाण्याचे प्रमाण असते. आज आपण जाणून घेऊयात अशा कोणत्या पदार्थांमुळे आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढेल.
काही भाज्या किंवा फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. या भाज्या आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. तसेच या भाज्यांमुळे आपल्याला कोणत्याही आजारांना सामोरे जावे लागत नाही.
टोमॅटो
टोमॅटोमध्ये 94 टक्के पाणी असते. हिवाळ्यात टोमॅटो खाल्याने शरीरात पाण्याची कमतरता होत नाही. उन्हाळ्यासोबत हिवाळ्यातही खाऊ शकतो. याशिवाय टोमॅटोमध्ये अनेक प्रकारचे आवश्यक पोषक आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात, ज्यामुळे शरीर केवळ हायड्रेटेड राहत नाही तर अनेक आजारांपासूनही सुरक्षित राहतो.
संत्री
संत्र्यामध्ये 87% पाणी असते. यामध्ये व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. हे आपल्याला थंडीतही हायड्रेट ठेवते.
सफरचंद
आपल्या आरोग्यासाठी सफरचंद खूप फायदेशीर असते. या फळामध्ये 86% पाणी असते. यामध्ये फायबर, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. हिवाळ्यात सफरचंद खाल्ल्याने आपली प्रतिकारशक्ती मजबूत होते. यामुळे आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण देखील कमी होत नाही.
दुग्धजन्य पदार्थ
दूध, दही आणि चीज यांसारखे दुग्धजन्य पदार्थ देखील शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. त्यामध्ये पाणी, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी मोठ्या प्रमाणात आढळते. एक कप दुधात 88% पाणी असते. त्याचप्रमाणे दह्यामध्ये 80% पेक्षा जास्त पाणी असते. त्यामुळे पचनक्रिया सुधारते.
पालक
हिरव्या पालेभाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण अंदाजे 93 % असते. हिवाळ्यात मिळणाऱ्या पालकामध्ये पाण्यासोबतच लोहही भरपूर असते. पालक रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते आणि तुम्हाला हायड्रेट ठेवते.
हेही वाचा : Health Tips : अक्रोड आणि खजूर एकत्र खाल्ल्यास काय होते ?
Edited By : Prachi Manjrekar