Thursday, January 2, 2025
HomeमानिनीHealth Tips : या पदार्थांनी हार्मोन्स होतील बॅलेन्स

Health Tips : या पदार्थांनी हार्मोन्स होतील बॅलेन्स

Subscribe
हार्मोन्स आपल्याला शरीरातील सर्वात महत्वाचा भाग आहे. हार्मोन्सचा परिणाम आपल्याला दैनंदिन जीवनावर सुद्धा होतो. तसेच हे पचन, प्रजनन क्षमता, मासिक पाळी, लैंगिक जीवन, मूड आणि इतर अनेक गोष्टींवर याचा खोलवर परिणाम होतो. तसेच हे हार्मोन्स असंतुलन झाल्यावर आरोग्याशी निगडित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि ताणतणावामुळे बऱ्याचदा हार्मोन्स इंम्बॅलेन्स होत असतात. त्यामुळे आज आपण जाऊन घेऊयात कोणत्या पदार्थांनी हार्मोन्स बॅलेन्स राहतील.

कलौंजी बिया 

कलौंजी बिया या चेहऱ्यावरील मुरम आणि केस कमी करते. केस गळतीची समस्या देखील दूर होते. कलौंजी बियांमध्ये असलेले फायटोस्ट्रोजेन्स हे हार्मोन्स बॅलेन्स करायला मदत करते.

तीळ

तिळाच्या सेवनाने अनियमित मासिक पाळी आणि हार्मोन्सच्या असंतुलनाची समस्या दूर होते. तिळामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि लोह असते. जे आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारामध्ये तिळाचा समावेश करू शकता.

- Advertisement -

भोपळयाच्या बिया

भोपळ्याच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम असते. हे शरीरातील तणाव संप्रेरक कोर्टिसोलची पातळी कमी करायला मदत करते. आपला मूड देखील चांगला राहतो. हे शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते. मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना देखील कमी होतात.

अंबाडी बिया

अंबाडीच्या बियांमध्ये लिग्नान नावाचे फायटोएस्ट्रोजेन्स असतात, जे इस्ट्रोजेन हार्मोन्स संतुलित करण्यास मदत करतात. यामध्ये असलेले ओमेगा-३ हार्मोन्स संतुलित करण्याचे आणि सूज कमी करण्यास मदत करते.

- Advertisement -

अंडी

हार्मोन्स संतुलित राहण्यासाठी तुम्ही आहारामध्ये अंड्यांचा समावेश करू शकता.

हार्मोनल संतुलनासाठी, या बियांचा आहारात समावेश करा.

हेही वाचा : Benefits of Apple : दररोज सफरचंद खाण्याचे फायदे


Edited By : Prachi Manjrekar

 

- Advertisment -

Manini