Sunday, February 16, 2025
HomeमानिनीHealth Tips : शरीरातील लोहाचे प्रमाण वाढवतील हे पदार्थ

Health Tips : शरीरातील लोहाचे प्रमाण वाढवतील हे पदार्थ

Subscribe

लोह शरीरासाठी अत्यंत गरजेचं आहे. लोह हे हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी आवश्यक असते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लोह आवश्यक असते.काही पदार्थांमुळे आपल्या शरीरातील लोहाचे प्रमाण वाढू शकते. आज आपण जाणून घेऊयात शरीरातील लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी कोणते पदार्थ उपयुक्त आहे.

शरीरातील लोहाचे प्रमाण वाढवणे का गरजेचे आहे ?

  • लोह हे हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी वापरले जाते.
  • हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशींमधील प्रथिने असते.
  • शरीरात लोहाचे पुरेसे प्रमाण असल्याने मेंदूचे कार्य सुधारते.

शरीरातील लोहाच्या अभावामुळे या समस्यांना सामोरे जावे लागते 

थकवा आणि अशक्तपणा

सतत थकवा वाटतो, ऊर्जा कमी होते. थोडेसे काम केल्यावरही दम लागत असतो.

त्वचेचा आणि केसांचा आरोग्य बिघडणे

त्वचा फिकट आणि निस्तेज होते. केस गळण्याची समस्या वाढते.

इम्युनिटी कमी होणे

शरीरातील इम्युनिटी कमी होते आणि संसर्ग होण्याची शक्यता वाढते आणि वारंवार सर्दी, खोकला किंवा इतर आजार होऊ शकतात.

लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी आहारात खालील पदार्थांचा समावेश करा

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते. पालक, स्विस चार्ड, आणि लॅम्ब लेट्युस या हिरव्या पालेभाज्यांमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. पालक मध्ये लोह, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. कोबी , रताळ आणि वाटाणे , ब्रोकोली, ब्रसेल्स स्प्राउट यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते.

व्हिटॅमिन C

शरीरात लोह वाढवण्यासाठी आहारात संत्रे, मोसंबी, आवळा, टोमॅटो, लिंबू, पेरू यांसारखे व्हिटॅमिन C समृद्ध असलेल्या पदार्थांचा समावेश करा.

मांसाहारी पदार्थ

मांसाहारी पदार्थांमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. मांस आणि इतर मांसाहारी पदार्थांमध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे तुम्ही आहारात मासे अंडी चिकन यांचा समावेश करू शकता.

हेही वाचा : Health Tips : ही योगासने ठेवतील बीपी कंट्रोलमध्ये


Edited By : Prachi Manjrekar

Manini