हिवाळ्यात ‘या’ फळांचा घ्या आहार

these fruits eat in winter season
हिवाळ्यात 'या' फळांचा घ्या आहार

आता हिवाळ्याची चाहूल सुरू झाली आहे. त्यामुळे आज आपण हिवाळ्यात कोणत्या फळांचा समावेश करावा हे पाहणार आहोत. असं म्हटलं जात ऋतूनुसार फळं खाणं खूप आरोग्यदायी असतं. हिवाळ्यात येणारी फळं खाल्ल्यामुळे अनेक आजारांवर मात करू शकतो. त्यामुळे हिवाळ्यात तुमच्या सॅलडमध्ये ही फळं जरूर असू द्या.

पपई

हिवाळ्यात शरीरात उष्णता वाढवणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे उष्ण पदार्थ खाणं गरजेचं आहे. पपईचं सेवन केल्याने शरीरात उष्णता वाढते. तसेच पपईमुळे मासिक पाळीची समस्या देखील दूर होते. नियमित पपई खाल्ल्यामुळे शरीरातील वाढलेले कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होते. पपईत फायबरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अपचन सारख्या पोटाच्या समस्या दूर होते.

पेरू

पेरूमध्ये फोलेट, फायबर्स, व्हिटॅमिन्स आणि अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असते. यामुळे हिवाळ्यात होणाच्या पोटाच्या तक्रारी दूर होतात. तसेच पेरूचे सेवन केल्यामुळे शुगर, सीरम टोटल कोलेस्टेरॉल ट्रायग्लिसेराइड्स आणि एलडीएल कोलेस्टेरॉल नियंत्रित राहते.

संत्री

हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी पडते. या कोरडेपणापासून मुक्ताता मिळवायची असेल तर संत्री जरूर खा. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन्स असतात जे त्वचेवरील सुरकुत्यापासून बचाव करते. तसेच यात असलेले पोटॅशिअममुळे उच्च रक्तदाब, हार्च अटॅक आणि स्ट्रोक सारखे आजार कमी करण्यास मदत होते.

डाळींब

गर्भवती महिलांसाठी डाळींब खूप फायदेशीर असतं. डाळिंबामुळे अशक्तपणा, पोटाच्या समस्या दूर होतात. तसेच वंध्यत्व सारख्या देखील समस्या दूर होतात. डाळिंबामध्ये अँटिऑक्सिडेंट्सचे प्रमाण अधिक असते. यामुळे कँसर, हार्ट अटॅक आणि डिप्रेशन सारखा आजारात दिलासा मिळतो.