Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर लाईफस्टाईल पावसाळ्यात 'डेंग्यू'ला दूर ठेवतील.. 'ही' फळं

पावसाळ्यात ‘डेंग्यू’ला दूर ठेवतील.. ‘ही’ फळं

डेंग्यूपासून तुमचं संरक्षण करण्याचं काम ही फळं करतात. डेंग्यू पेशंटसाठीसुद्धा ती लाभदायक ठरु शकतात.

Related Story

- Advertisement -

पावसाळ्याच्या दिवसांत साचणारं पाणी आणि घाण यामुळे रोगराई जास्त प्रमाणात पसरते. साचलेल्या पाण्यामंध्ये डासांची पैदासही मोठ्याप्रमाणावर होत असते. पर्यायने डासामुळे होणाऱ्या डेंग्यू रोगाची लागण होण्याचा धोका या दिवसांत अधिक असतो. डेंग्यू झाल्यास त्यावर औषधी उपचार तर मिळतातच, मात्र काही फळं किंवा त्यांचा रससुद्धा डेंग्युपासून तुमचं संरक्षण करतात. जाणून घेऊयात कोणती आहेत ही फळं…

संत्र – संत्र्यामध्ये अनेक पोषक तत्वं मुबलक प्रमाणात असतात. मुख्यत: संत्र्यात असलेल्या व्हिटॅमिन ‘सी’ आणि फायबर या घटकांची शरीराला खूप आवश्यकता असते. शराराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी अत्यावश्यक असतं. दररोज एक संत्र खाल्ल्याने तुमचं आरोग्य चांगलं राहू शकतं. संत्र्यांचा ज्यूस पिणंही उत्तम.

- Advertisement -


शहाळं – शहाळ्याच्या पाण्यात मोठ्याप्रमाणात पोटॅशिअम असतं. पोटॅशिअम शरीरातल्या पोषक तत्वांच्या वाढीसाठी खूप आवश्यक असतं. डेंग्युमुळे आलेला अशक्तपणा घालवण्यासाठी शहाळ्याचं पाणी भरभपूर उर्जा देतं.

- Advertisement -

डाळिंब – डेंग्यू पेशंट्सनी दिवसातून दोनदा डाळिंबाचा रस पिणं चांगलं असतं. डाळिंबामुळे शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढण्यास मदत होते. तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास त्यामुळे मदत होते.

पपई – पपईमध्ये शरीराला आवश्यक असलेले ‘क’ जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते. उत्तम रोगप्रतिकारक असलेली व्यक्ती कोणत्याही आजारावर लवकर मात करु शकते.

[टीप: ही फळांचं सेवन करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.]

- Advertisement -