आपण सुंदर दिसावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. वाढत्या वयात त्वचा तजेलदार आणि चमकदार दिसावी यासाठी महागडे उपचारही केले जातात. पण, इतके प्रयत्न करूनही अनेकांना वयाच्या आधीच वृद्धत्वाची समस्या सुरू होते म्हणजेच अकाली वृद्धत्व सुरू होते. अकाली वृद्धत्वामुळे सुरकुत्या, निस्तेज त्वचा जाणवू लागते. अकाली वृद्धत्वाला अनेकदा चुकीच्या सवयी कारणीभूत ठरू शकतात. या सवयीमुळे तुम्हाला लवकर वृद्धत्व येते. त्यामुळे जाणून घेऊयात, अकाली वृद्धत्वाला कारणीभूत ठरणाऱ्या सवयी कोणत्या आहेत,
धुम्रपान –
धुम्रपानाचा त्वचेवर खोलवर परिणाम होतो. वयाच्या आधीच चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याचे कारण धुम्रपानाची सवय असू शकते. धुम्रपानाच्या सवयीमुळे त्वचेची लवचिकता कमी होते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या, बारीक लाइन्स येऊ लागतात.
अल्कोहोल –
अल्कोहोलमुळे शरीरात डिहाड्रेशन होते. ज्यामुळे त्वचा ड्राय आणि निर्जीव दिसू लागते. या सर्वामुळे अकाली वृद्धत्वाची समस्या सुरू होते.
जंक फूड –
जास्त साखरेचे पदार्थ, प्रोसेस्ड फूड आणि तेलकट पदार्थ आरोग्यासह त्वचेचे नुकसान करतात. त्यामुळे त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी तुम्ही हेल्दी फूड खायला हवे. यासाठी आहारात ताजी फळे, भाज्या आणि ड्रायफ्रुट्सचा समावेश करावा.
झोपेचा अभाव –
अपूर्ण झोपेचा शरीरासह त्वचेवरही खोलवर परिणाम होतो. रोज 7 ते 8 तास झोप न घेतल्याने अकाली वृद्धत्वाची समस्या निर्माण होते. त्यामुळे धावपळीच्या आयुष्यात दररोज किमान 7 तासांची झोप होईल याची काळजी घ्यावी.
पाणी कमी पिणे –
पाणी कमी पिणे अनेक आजांराना आमंत्रण देणारी सवय ठरू शकते. पाण्याच्या अभावामुळे त्वचेच्या तक्रारी सुरू होतात. ज्यातील सर्वात मोठी म्हणजे चेहऱ्यावर सुरकुत्या येणे. त्यामुळे अकाली वृद्धत्वापासून दुर राहायचे असेल तर पुरेशा प्रमाणात पाणी प्यायला हवे.
व्यायाम न करणे –
नियमित व्यायामाच्या सवयीमुळे शरीर तंदूरुस्त राहते. त्यामुळे जेव्हा तुम्ही रोज जॉगिंग, वॉकिंग आणि सायकलिंगचा सराव करता तेव्हा वृद्धत्वाची प्रकिया मंदावते आणि अधिक काळ तुम्ही तरूण दिसता.
ताणतणाव –
ताणतणावाच्या समस्येमुळे लोक लवकर वृद्ध दिसू लागतात. अनेकदा आपण कशामुळे वृद्ध दिसत आहोत,, हे अनेकांना ठाऊकही नसते. खरं तर, ताणतणाव हा एक सायलेंट किलर ठरू शकतो. त्यामुळे दिर्घकाळ तरूण दिसायचे असेल तर ताण घेणे टाळायला हवे.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde