Monday, January 20, 2025
HomeमानिनीThese Foods Never Expire : स्वयंपाकघरातील या पदार्थांना नसते एक्सपायरी डेट

These Foods Never Expire : स्वयंपाकघरातील या पदार्थांना नसते एक्सपायरी डेट

Subscribe

बाजारातून कुठल्याही पदार्थांची खरेदी करताना आपण आधी त्यावर दिलेली एक्सपायरी डेट (expiry date) बघत असतो. एक्सपायरी डेट जवळची असेल तर आपण तो पदार्थ खरेदी करणे टाळतो. पण आपल्या स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी असतात ज्यांची कधीच एक्सपायरी डेट नसते. काही गोष्टी जितक्या जुन्या होतात तितक्या चांगल्या राहतात. त्यामुळे काही गोष्टी फेकून देण्याची चूक कधीही करू नका. कोणते आहेत हे स्वयंपाकघरातील पदार्थ जाणून घेऊयात.

मध

तुम्ही मध कधीही खाऊ शकता. ओरिजनल किंवा देशी मधाला कधीच एक्स्पायरी डेट नसते. तर दुसरीकडे, दीर्घकाळ ठेवलेला मध अधिक अधिक टेस्टी होत जाते. जर तुमच्याकडे मध असेल तर तुम्ही त्याची काळजी करू नका कारण ते खराब होणार नाही.

तूप

तूप वर्षानुवर्षे टिकते. त्याची चव थोडी कोमल असल्याने लोक ते पुन्हा गरम करून साठवतात. अशा प्रकारे ते बराच काळ वापरात राहते. त्यामुळे तुमच्याकडेही तूप असेल किंवा तुम्ही घरी तूप बनवत असाल तर वर्षानुवर्षे ढवळत राहा. आणि या गोष्टींच्या एक्सपायरी डेटचा जास्त विचार करू नका.

मीठ

साधे पांढरे मीठ असो किंवा सैंधव, कोणत्याही प्रकारचे मीठ नीट स्टोअर करून ठेवल्यास बऱ्याच काळापर्यंत खराब होत नाही. फक्त ते हवा किंवा पाण्याच्या संपर्कात आल्यास मात्र खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे एका हवाबंद डब्यात किंवा बाटलीत मीठ नीट साठवून ठेवावे.

पास्ता

पास्ता ओलाव्यामुळेही खराब होत नाही. एखादा हवाबंद डबा किंवा बाटलीमध्ये पास्टा स्टोअर करावा. त्याची एक्सपायरी डेट उलटून गेल्यानंतरही 1 ते 2 वर्ष पास्ता वापरता येऊ शकतो. पास्तामध्ये किटकांचा संसर्ग होऊ नये म्हणून तुम्ही लाल मिरचीचा वापर करू शकता.

कुरमुरे

कुरमुरे किंवा मुरमुरे कधीच खराब होत नसून, त्यांनाही एक्सपायरी डेट नसते. कुरमुरे फक्त हवेच्या संपर्कात आल्यास नरम होतात. पण, ते पुन्हा गरम केल्यास लगेचच कुरकुरीतही होतात.

हेही वाचा : Yoga For Hair Fall : केस गळतीवर उपयुक्त योगा


Edited By : Nikita Shinde

Manini