Wednesday, January 15, 2025
HomeमानिनीAir Pollution : प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी बाल्कनीत लावा ही झाडे

Air Pollution : प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी बाल्कनीत लावा ही झाडे

Subscribe

दिवाळी म्हटले की, फटाके फोडले जातात. फटाक्यांच्या आवाजामुळे आणि धूरामुळे प्रदूषण होते. प्रदूषणामुळे श्वसनाच्या समस्या निर्माण होतात. आजकाल बरेच जण श्वसनाच्या समस्येशी झुंज देत आहेत. आता तर दिवाळीचे दिवस सुरू आहेत. फटाक्यांच्या धुरामुळे हवेत प्रदूषण होऊ शकते. अशा परिस्थितीत, प्रदुषणाच्या प्रभावापासून घराचे संरक्षण करण्यासाठी तुम्हला काही झाडे मदत करू शकतात. या झाडांमुळे जास्तीत ऑक्सिजन तुम्हाला मिळेल. पाहूयात, अशी प्रदूषण शोषणारीझाडे

तुळस –

वास्तूशास्त्रानुसार घरात तुळशीचे रोप असणे शुभ मानले जाते. तुळशीच्या बियांमध्ये औषधी गुणधर्म आढळतात. याशिवाय तुळशीचा चहा सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांवर रामबाण उपाय मानला जातो. तुळशीचे रोप केवळ औषधी गुणधर्मांसाठी नाही तर ऑक्सीजन देण्यासाठी ओळखले जाते. हवेतील कार्बन मोनोक्साइड, कार्बन डाय ऑक्साइड आणि सल्फर डायऑक्साइड सारख्या घातक वायूंना शोषून घेतो. त्यामुळे दिवाळीतील प्रदूषणापासून वाचण्यासाठी घरात तुळशीचे रोप लावू शकता. तुळशीच्या रोपामुळे परिसरातील हवा शुद्ध होण्यास मदत होते.

स्पायडर प्लांट –

स्पायडर प्लांट प्रदूषण दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो. एखाद्या एअर प्युरीफायर प्रमाणे स्पायडर प्लांट हवा शुद्ध करण्याचे काम करतो. स्पायडर प्लांट एक इनडोअर प्लांट आहे. त्यामुळे दिवाळीतील फटाक्यांमुळे होणाऱ्या धुराचे प्रदूषणापासून वाचण्यासाठी तुम्ही घरात स्पायंडर प्लांट लावायला हवा.

मनीप्लांट –

मनीप्लांट आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी घरात लावले जाते. हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी मनीप्लांट तुम्हाला खूप उपयुक्त ठरू शकते. मनी प्लांट घरात आणि घराबाहेरही लावता येते.

कडूलिंब –

कडूलिंबाचे झाड ऑक्सिजन देण्यासाठी ओळखले जाते. जर तुमच्या घराजवळ कडूलिंबाचे झाड असेल तर तुम्हाला उपयुक्त ठरू शकते आणि नसेल तर तुम्ही कुंडीतही या झाडाची लागवड करू शकता. यासह कडूलिंबाचे झाड अनेक औषधी गुणधर्मासाठी ओळखले जाते.

पिंपळ –

खरं तर, पिंपळाचे झाड घराजवळ लावण्यास अनेक जण घाबरतात. पण, पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून पिंपळाचे झाड वरदान समजले जाते. दिवसाचे 24 तास पिंपळाचे झाड ऑक्सिजन देऊ शकते. त्यामुळे घराच्या आसपास शुद्ध हवेसाठी तुम्ही पिंपळाचे झाड लावू शकता.

 

 

 

हेही पाहा –


Edited By – Chaitali Shinde

Manini