शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी योग्य उपाय खूप महत्त्वाचे असतात. संतुलित आहार, नियमित व्यायाम, मानसिक शांतता आणि योग्य जीवनशैली हे आरोग्य टिकवण्याचे मुख्य आधारस्तंभ आहेत.नैसर्गिक उपाय, घरगुती उपचार आणि विज्ञानाधारित सल्ला यांचा योग्य वापर केल्यास आपण सहजपणे निरोगी जीवन जगू शकतो. आज आपण या लेखातून आजर दूर करण्यासाठी काही प्रभावी उपाय जाणून घेऊयात जे तुम्हाला आजरांपासून दूर ठेवतील आणि जीवन अधिक आनंदी बनवतील.
नियमित आहार
ताज्या फळे, पालेभाज्या, डाळी आणि संपूर्ण धान्य खा.गरजेपुरती प्रथिने, चांगले चरबी असलेले पदार्थ म्हणजे गूळ, बदाम, अक्रोड आणि फायबर असलेल्या पदार्थांचं सेवन करा. साखर आणि जास्त तेलकट पदार्थ कमी करा.
योग्य जीवनशैली
योगा, चालणे, पळणे असे नियमित व्यायाम करा. कमीतकमी ७-८ तासांची झोप घ्या. मद्य, तंबाखू आणि सिगारेट टाळा.
स्वच्छता आणि संसर्ग टाळा
हात वारंवार धुवा.तोंड, डोळे आणि नाक स्वच्छ ठेवा.आजारी व्यक्तींपासून शक्य तितके दूर रहा.
तणाव कमी करा
ध्यान, प्राणायाम आणि योगासनांचा सराव करा. हसण्याचा आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.
घरगुती उपाय
आल्याचा काढा, हळदीचे दूध आणि लसूण याने तुमची प्रतिकारशक्ती वाढू शकते. कोमट पाण्यात लिंबू आणि मध घेतल्याने शरीर डिटॉक्स होते.तुळशीच्या पानांचा रस सर्दी-खोकल्यावर प्रभावी असतो.
नियमित आरोग्य तपासणी
नियमित वारंवार होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका.आवश्यक तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घ्या. या सोप्या उपायांनी तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता आणि निरोगी आयुष्य जगू शकता. हेही वाचा : Health : पचनक्रिया सुधारण्यासाठी खाण्यात करा हे बदल
Edited By : Prachi Manjrekar