साड्या भारतातील सर्वात शोभिवंत कपड्यांपैकी एक आहे. साडी जुन्या काळापासून ते आताच्या पिढीला देखील नेसायला खूप आवडते. विशेषतः पारंपरिक आणि हैंडलूमच्या साड्या जगात खूप प्रसिद्ध आहेत. हैंडलूम साड्या हे केवळ परंपरा आणि संस्कृतीचे प्रतीक नाही, तर फॅशनच्या जगातही त्यांचे विशेष स्थान आहे. तसेच अनेक राज्ये आहेत, ज्यांच्या स्वतःच्या विशिष्ट साड्या आहेत, ज्या त्यांच्या परंपरा, इतिहास आणि कला चांगल्या प्रकारे प्रतिबिंबित करतात. रेखा, दीपिका पदुकोण, ऐश्वर्या राय बच्चन यांसारख्या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींनाही खास प्रसंगी अशा साड्या नेसायला आवडतात. आज आपण जाणून घेऊयात अशा कोणत्या साड्या आहेत ज्या राज्याची शान देखील आहेत.
कांजीवरम साडी ( तामिळनाडू )
कांजीवरम साडी ही तामिळनाडूची शान आहे. या विशेषतः शुद्ध रेशीम आणि सोन्याच्या धाग्यापासून बनवली जाते. बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री रेखाला कांजीवरम साड्या नेसायला खूप आवडते. विशेषतः लग्न आणि पारंपारिक कार्यक्रमांमध्ये ती कांजीवरम साडीच नेसते. या साड्यांची चमक आणि रॉयल लुक त्यांना खरोखरच त्यांच्या राज्याची शान बनवते.
बनारसी साडी (उत्तर प्रदेश)
बनारसी साडी, म्हणजे भव्य रॉयल वेडिंग ड्रेस. ही साडी वाराणसीची शान आहे आणि या साडीचे विणकाम आणि जरीचे काम या साडीला खास बनवते. बनारसी साड्यांमध्ये रेशीम आणि सोने किंवा चांदीच्या जरीचा वापर केला जातो आणि म्हणूनच या साड्या लग्नासाठी निवडल्या जातात.
पटोला साडी (गुजरात)
गुजरातची पटोला साडी तिच्या सुंदर पॅटर्नसाठीही ओळखली जाते. ही दुहेरी इकत साडी आहे, ही साडी बनवायला काही महिने लागतात. या साडीचा रंग आणि डिझाइन प्रत्येक प्रसंगासाठी योग्य आहे आणि म्हणूनच प्रत्येक मुलीच्या वॉर्डरोबमध्ये ते असणे आवश्यक आहे.
बलुचारी साडी आणि टँट साडी (पश्चिम बंगाल)
पश्चिम बंगालची बालुचारी साडी तिच्या कला आणि कथाकथन डिझाइनसाठी प्रसिद्ध आहे. पौराणिक कथा आणि गुंतागुंतीचे विणकाम या साडीत पाहायला मिळते. हे पारंपारिक तसेच आधुनिक फॅशनचे प्रतीक आहे. तर टँट साड्या सुती धाग्याने बनवलेल्या हलक्या साड्या आहेत ज्या त्यांच्या सुंदर ड्रेपसाठी प्रसिद्ध आहेत.
पैठणी साडी (महाराष्ट्र)
महाराष्ट्राची शान म्हणजेच पैठणी साडी ही सिल्क आणि जरीच्या कामासाठी देखील ओळखली जाते. या साडीमध्ये मोर, कमळ आणि इतर नैसर्गिक रचना पाहायला मिळतात. ही साडी महाराष्ट्रातील पारंपारिक समारंभांमध्ये परिधान केली जाते.
चिकनकारी साडी (लखनौ)
लखनऊची चिकनकारी साडी भरतकामासाठी प्रसिद्ध आहे. चिकनकारी हाताने तयार केली जाते. हलके रंग आणि सुंदर नक्षी असलेली ही साडी अतिशय आरामदायक आहे. या पारंपारिक साड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते आधुनिक फॅशनशीही चांगले जुळतात.
हेही वाचा : Durga Puja 2024 : दुर्गापूजेला करा सेलेब्रिटी लूक
Edited By : Prachi Manjrekar