Thursday, March 27, 2025
HomeमानिनीFashion Tips : स्लिम गर्ल्ससाठी कियारा अडवानीच्या या साड्या बेस्ट

Fashion Tips : स्लिम गर्ल्ससाठी कियारा अडवानीच्या या साड्या बेस्ट

Subscribe

कियारा अडवानी ही बॉलीवुडमधली सुप्रसिद्ध अभिनेत्री असून ती तिच्या अभिनय आणि फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. ती तिच्या प्रत्येक ऑउटफिटवर खूप सुंदर आणि स्टायलिश दिसते . कियारा अडवानी ही एथनिक आणि वेस्टर्न दोन्ही लूकमध्ये खूप सुंदर दिसते. जर तुम्हाला कियारा अडवानीची फॅशन खूप आवडत असेल तर तुम्ही तिची स्टाइल फॉलो करू शकता. कियाराच्या साड्या देखील खूप सुंदर आणि आकर्षक असतात तुम्ही देखील कियारा अडवानीच्या काही सुंदर साड्या ट्राय करू शकता. आज आपण जाणून घेऊयात कियारा अडवानीच्या कोणत्या साड्या आपण ट्राय करू शकतो.

एम्ब्रॉयडरी साडी

एम्ब्रॉयडरी साड्या या खूप सुंदर आणि आकर्षक दिसतात. जर तुमची फिगर कियारा अडवानीप्रमाणे असेल तर तुम्ही ही एम्ब्रॉयडरी साडी निश्चितपणे स्टाइल करू शकता. या अभिनेत्रीने मखमली कापडापासून बनलेला ब्लाउज घातला आहे. तिची ही मनीष मल्होत्राने डिझाइन केली आहे. तुम्हाला अशी साडी ऑनलाइन सहजपणे मिळेल.

टिश्यू साडी

कियारा अडवानीने रेनबो कलरची टिश्यू साडी नेसली आहे. या साडीमध्ये ती खूप सुंदर आणि ग्लॅमर्स दिसत आहे. साडीवर असलेले गोल्डन रंगाचा झरी वर्कमुळे तिचा लूक अजून ग्रेसफुल वाटतं आहे. तिने टिश्यू साडीसह गुलाबी रंगाचा हैवी वर्क ब्लाउज घातला आहे. यासह, तुम्ही स्टोन लाँग ज्वेलरी, मॅचिंग इअररिंग्ज आणि सरळ केसांचा लूक ट्राय करू शकता.

जॉर्जेट व्हाइट साडी

जॉर्जेट व्हाइट साडी हा एक उत्तम पर्याय असून तुम्ही कियारासारखी पांढरी जॉर्जेट साडी नेसू शकता. पांढरी जॉर्जेट साडी तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. या साडीवर केलेले वर्क साडीचे सौंदर्य वाढवत आहे. या साडीसोबत ट्यूब ब्लाउज घालून तुम्हाला एक स्टायलिश लूक मिळेल

तुम्ही या कियारा अडवानीच्या साड्या ट्राय करू शकता.

हेही वाचा : Fashion Tips : स्टायलिश कॉर्ड सेट


Edited By : Prachi Manjrekar

Manini