आपल्या घरात अशा अनेक वस्तू असतात, ज्या दिसायला खूप सामान्य वाटत असल्या तरी त्यांचा चुकीचा वापर आपल्या जीवाला धोका देणारा ठरु शकतो. या वस्तूंचा वापर आपल्या नियमित जीवनाशी संबंधितच आहे. पण तरीही त्याचा वापर करताना योग्य काळजी घ्यावी.
- परफ्युम
हे लहान मुलांसाठी हानिकारक आहे. परफ्युम किंवा डियोमध्ये असणार्या रसायनामुळे नवजात शिशुंचा विकास योग्य होत नाही, असे एका वैद्यकिय संशोधनातून समोर आहे.
- लेड पेंट
जर तुमचे घर खुप जुने असेल तर तुम्हाला लेड पेंटचा धोका आहे. जर पेंट भिंतीवर लावलेला असेल तर काही हरकत नाही. परंतु, जर त्याचा रंग निघत असेल तर हे विषारी असू शकतं.
- सनस्क्रीन लोशन
उन्हापासून बचाव करणारे सनस्क्रीनमध्ये काही असे केमिकल्स असतात. ज्यामुळे गरोदर स्त्रीला त्याचा त्रास होऊन लहान बाळाच्या विकासातही अडचण येऊ शकते.
- भिंतींची पापडी
पावसामुळे घराच्या भिंतीचे निघणारी पापडी जर जास्त प्रमाणात निघत असेल तर त्यामुळे अॅलर्जिक रिअॅक्शन, दमा, अॅटॅक आणि कॅन्सर होऊ शकतो.
- हेयर डाय
केसांना काळे करणार्या हेयर डायमध्ये असणार्या रसायनांमुळे कॅन्सर होऊ शकतो.त्यामुळे जर तुम्ही सतत हेअर डाय करत असाल तर तुम्हाला काळजी घ्यायला हवी.
हेही वाचा :