Sunday, December 15, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीFashionWinter Hair Care Tips : हिवाळ्यात स्कैल्प ड्राय होण्याची समस्या या टिप्सने...

Winter Hair Care Tips : हिवाळ्यात स्कैल्प ड्राय होण्याची समस्या या टिप्सने कमी होईल

Subscribe

हिवाळयात स्कैल्प ड्राय होण्याची समस्या खूप सामान्य आहे. परंतु या समस्यांकडे दुर्लक्ष केल तर केसांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. हिवाळ्यात हवेतील आर्द्रता आणि तापमान कमी होते. त्यामुळे स्कैल्पही ड्राई होते. आज आपण जाणून घेऊयात, कोणत्या टिप्सने हिवाळ्यात स्कैल्प ड्राई होण्याची समस्या कमी होईल.

ड्राय स्कैल्पमूळे केसांवर कोणता परिणाम होतो

डँड्रफ

स्कैल्प ड्राय झाल्यामुळे केसांमध्ये डँड्रफची समस्या वाढते. त्यामुळे केस लेगच गळतात.

- Advertisement -

केस तुटणे

स्कॅल्प कोरड्या असल्यामुळे केसांच्या मुळांना योग्य पोषण मिळत नाही, ज्यामुळे केस कमकुवत होऊन लेगच तुटतात.

केस गळती

केस वारंवार ड्राय होत असतील तर केस सहजपणे गळतात.

- Advertisement -

या टिप्सने हिवाळ्यात स्कैल्प ड्राय होणार नाही

याप्रकारे हेअर वॉश करा

हिवाळयात स्कैल्प ड्राय होण्याचे मुख्य कारण म्हणजे गरम पाणी.हिवाळयात आपण बऱ्याचदा गरम पाण्याची आंघोळ करतो त्यामुळे केस अजूनच ड्राय होतात. त्यामुळे शक्यतो या ऋतूमध्ये केस ड्राय न होण्यासाठी कोमट पाण्याने आंघोळ करा.

स्कैल्पवर कंडीशनर लावू नका

स्कैल्पवर कंडीशनर लावू नका. स्कैल्पवर कंडीशनर लावल्याने केस मोठ्या प्रमाणात गळू लागतात. तसेच स्कैल्प ड्राय देखील होते.

हिटिंग टूल्सचा वापर करू नका

बऱ्याचदा हिटिंग टूल्सचा वापर केल्याने केस खराब होतात, केसातील पोषक तत्व देखील पूर्णपणे निघून जाते.

हेअर मास्क

जर तुमची केस खूप कोरडी झाली असतील तर तुम्ही हेअर मास्कचा वापर करू शकता. याने केस कोरडी होणार नाही.

हेही वाचा : Marigold Flowers : तजेलदार त्वचेसाठी वापरा झेंडूची फुले


Edited By : Prachi Manjrekar

- Advertisment -

Manini