प्रत्येकजण आपले स्वतःचे घर छानपैकी सजवत असतो, पण घराची बाल्कनी सजवताना विशेष काळजी घ्यावी लागते. ती म्हणजे घराच्या बाल्कनीत नेहमी कबुतरे ये जा करत असतात. यामुळे बाल्कनीत प्रचंड घाण होते. आणि याचा त्रास महिलांना जास्त होतो. कारण कबुतरे सतत येतात आणि त्यांची विष्ठा तिथे पडते ज्यामुळे बाल्कनी मध्ये दुर्गंधी पसरते. आणि याचा सगळा वास संपूर्ण घरात येतो. ज्यामुळे घरातील लोकांना याची अॅलर्जी होते. तसेच कायमस्वरूपी आपले घर जर का कबुतरांमुळे घाण होत असेल तर काही झाडांच्या मदतीने तुम्ही घरात अशा प्रकारची झाडे लावू शकता. यामुळे घराची बालकांनी स्वच्छ राहील.
- घराच्या बाल्कनीत कबुतरे येत असतील तर काही झाडांमुळे ती लांब होत असतात.
- कबुतरे घराच्या बाहेरील कोपऱ्यात आरामात राहतात आणि बरीच घाण करतात.
- कबुतरांच्या विष्टेमुळे घाण वास येतो आणि या वासाची अॅलर्जी कोणालाही होऊ शकते.
- पण जर का तुम्ही या प्रकारची झाडे बाल्कनीत लावलीत तर कबुतरे जवळ येणार नाहीत.
- काही काही झाडांमुळे घराजवळ कबुतरे येत नाहीत आणि त्या झाडांच्या वासामुळे कबुतरे लांब पळतात.
- कॅटेकसचे रोप जर का तुम्ही बाल्कनीत लावले तर याचे काटे आणि आणि हे रोपटे कबुतरांना आजिबात आवडत नाही.
- डेफोडिल या झाडांचा वास कबुतरांना आजिबात आवडत नाही. आणि या वासामुळे कबुतरे घराच्या बाल्कनीत जरा पण येत नाहीत.
- लसणाचे रोपटे जरा का तुमच्या बाल्कनीत तुम्ही लावले तर खूप फायदेशीर आहे. तसेच यांचा वास सुद्धा कबुतरांना आवडत नाही.
- पुदिनाचे झाड घराच्या बाजूला असेल किंवा बाल्कनीत असेल तर इथे कबुतरांची ये जा नसते.
- कारण पुदिन्याचा कडक सुगंधाने कबुतरांना त्रास होतो.
- जर का घरात खूप मच्छर किंवा कबुतरे सारखे येऊन बसत असतील तर तुम्ही तुमच्या बाल्कनीत सिट्रोनेला झाडाचे रोपटे लावू शकता. ज्यामुळे कबुतरे आणि मच्छर यांचा वावर कमी राहील.
- Advertisement -
_______________________________________________________________________
हेही वाचा : काळी पडलेली प्लास्टिकची खुर्ची अशी करा स्वच्छ
- Advertisement -