Tuesday, February 18, 2025
HomeमानिनीMonsoon Food- पावसाळ्यात रोगमुक्त राहण्यासाठी आहारात करा या 5 भाज्यांचा समावेश

Monsoon Food- पावसाळ्यात रोगमुक्त राहण्यासाठी आहारात करा या 5 भाज्यांचा समावेश

Subscribe

पावसाळ्यात काही ठराविक भाज्यांचा आहारात समावेश केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. कारण या दिवसात रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. यामुळे काही औषधी भाज्या आपले आजारापासून संरक्षण करतात.

पडवळ
पावसाळ्यात सर्दी, खोकला,डोकेदुखी यासारखे आजार उद्धभवतात. यामुळे मान्सूनमध्ये जीवनसत्वाने पुरेपुर असलेल्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पडवळ नक्की खावे. यामुळे आजार लांब राहतात.

 रताळे
पावसाळ्यात रताळ्याचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. रताळे हे कंदमूळ आहे. त्यामुळे त्यात इतर भाज्यांप्रमाणे पावसाळ्यातील आजारांना कारणीभूत ठरणारे जीवाणू नसतात. त्यामुळे रताळेसारखे कंदमूळ या सिझनमध्ये अवश्य खावे.

दुधी
दुधीभोपळ्याला सर्वात आरोग्यदायी भाजी मानली जाते. वजन कमी करण्यासाठी, साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि आता रोग रोखण्यासाठी हे उपयुक्त आहे. पावसाळ्यात दुधीभोपळ्याचे सेवन करणे फायदेशीर आहे.
कारण त्यात मुबलक प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे पाचन प्रक्रीया सुधारते. तसेच यात कॅलरीड कमी असतात. त्यामुळे वजन वाढत नाही.

कारले
बऱ्याचजणांना कारल्याचे नाव ऐकलं तरी जिभेवर कडूपणा येतो. कारण कारल्याची चवच कडू आहे. यामुळे आपण कडू कारले खाणे टाळतो.
पण कारले ही सर्वात आरोग्यदायी, उपयुक्त भाजी आहे. कारले विषाणूजन्य पावसाळ्यातील आजारांपासून बचाव करण्याबरोबरच असंख्य आरोग्य फायदे प्रदान करते.

 ढेमसे
या यादीतील तिसरी भाजी म्हणजे ढेमसे किंवा भारतीय स्क्वॅश. इतर भाज्यांपेक्षा या फळभाजीची चव सामान्य आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात ही भाजी खाल्ली जाते. ही भाजी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. या भाजीमध्ये दाहक-विरोधी घटक असतात जे पचन प्रक्रियेस प्रोत्साहन देतात, जळजळ कमी करतात आणि आम्लता नियंत्रित करतात. यामुळे पावसाळाच नाही तर सगळ्याच सिझनमध्ये ढेमसे खाणे फायदेशीर आहे.

 

Manini