बदलती लाइफस्टाइल, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे संपूर्ण शरीरावर परिणाम होत आहे. अनहेल्दी खाल्ल्याने शरीरात पोषक तत्त्वांची कमतरता निर्माण होते. यात फायबरही कमी झाल्याने शरीराच्या तक्रारी सुरू होतात. जसे की, अपचन, लठ्ठपणा. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला अशा भाज्या सांगणार आहोत, ज्याच्या सेवनाने फायबरची कमतरता पूर्ण होईल. जाणून घेऊयात, अशा भाज्या ज्याच्या सेवनाने फायबरची कमतरता पूर्ण होते .
सुरण –
शरीरातील फायबरची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही सुरण खायला हवे. यामध्ये तुम्हाला सुरण उकडवून खाता येईल किंवा सुरणाची भाजी, सुरणाचे काप करून खाता येतील. 100 ग्रॅम सुरणमध्ये सुमारे 4.1 ग्रॅम फायबर आढळते.
भेंडी –
फायबरचा उत्तम स्त्रोत म्हणून भेंडी या भाजीकडे पाहिले जाते. यासाठी तुम्ही भेंडीची भाजीचे सेवन अवश्य करा. 100 ग्रॅम भेंडीमध्ये सुमारे 5 ग्रॅम फायबर आढळते.
मटार –
हिवाळ्यात बाजारात मटार दिसू लागतात. या मटारमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते. त्यामुळे शरीरातील फायबरची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही मटार खाऊ शकता. मटारमध्ये फायबरसोबत व्हिटॅमिन, प्रोटीन्स, आयर्नसारखी पोषक तत्वे आढळतात.
रताळे –
रताळ्याबद्दल आरोग्यदायी आहे. यामध्ये फायबरसह अनेक पोषकतत्वे आढळतात.
ब्रोकोली –
ब्रोकोलीमध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. ब्रोकोली खाल्याने दिर्घकाळ भरलेले राहते. 100 ग्रॅम ब्रोकोलीमध्ये सुमारे 2.6 ग्रॅम फायबर असते.
गाजर –
गाजर फायबरसह अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. त्यामुळे फायबरची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही गाजर खायला हवे.
भाज्याव्यतिरिक्त पुढील पदार्थ खाऊ शकता –
- रोज सकाळी उठून तुम्ही भिजवलेले बदाम, अंजीर, पिस्ता खायला हवेत. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळतात.
- फायबरची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही अळशीचे सेवन करू शकता. अळशीमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, मॅग्नेशियम, कॉपर, ओमेगा-3 फॅटी ऍसिड आदी पोषक तत्वे आढळतात. त्यामुळे शरीर निरोगी ठेवण्यासाठी अळशीचे सेवन करावे.
- भारतीय डाळी प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे शरीरात जर फायबरची कमतरता असेल आहारात डाळींचा समावेश करावा.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde