कोलेस्ट्रॉल शरीरासाठी आवश्यक असते. शरीरात चांगले आणि खराब असे दोन प्रकारचे कोलेस्ट्ऱॉल असतात. खराब कोलेस्ट्रॉल शरीरासाठी हानिकारक असते. कोलेस्ट्रॉलची पातळी शरीरात वाढल्यावर रक्तवाहिन्या बंद होतात आणि हृदयविकाराचा झटका, स्ट्रोकसारख्या आजारांचा धोका वाढतो. पण, नियमित व्यायाम आणि आहारात काही बदल केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करता येऊ शकते. यासाठी आहारात तुम्हाला काही भाज्यांचा समावेश करावा लागेल. पाहूयात, कोणत्या भाज्यांच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल कमी होते.
पालक –
हिरव्या पालेभाज्यांपैकी पालक विविध पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. या भाजीत फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियमसारखे पोषकतत्वे आढळते. पालकामधील फायबर पचनसंस्था निरोगी राहते. याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे पालकाच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल कमी होते. ज्यामुळे हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो.
ब्रोकोली –
ब्रोकोलीमध्ये आढळणारा सल्फोराफेन नावाचा घटक शरीरातील खराब कोलेस्ट्ऱॉल कमी करतो. त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात ब्रोकोलीचा समावेश करणे फायद्याचे ठरेल.
वांगी –
वांग्यामध्ये असणारे फायबर शरीरातील खराब कोलेस्ट्ऱॉल कमी करण्यासाठी फायदेशीर असतात. याशिवाय वांग्यामध्ये अॅंटी-ऑक्सिडंट रक्तवाहिन्या डॅमेज होण्यापासून बचाव करतात.
भेंडी –
भेंडीमध्ये शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करणारे घटक असतात. भेंडीमध्ये चिकट पदार्थ असतो, ज्याला म्यूसिलेजही असे म्हणतात. यामुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी होते. शरीरात चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवण्यासाठी नियमितपणे भेंडीचे सेवन करायला हवे.
गाजर –
गाजरामध्ये असणारे बायोएक्टिव्ह कंपाउड्स आणि फायबर कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करतात. त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्ऱॉल कमी करण्यासाठी तज्ञ गाजर खाण्याचा सल्ला देतात. याशिवाय गाजराच्या नियमित सेवनाने दृष्टी सुधारते.
दुधी –
दुधीमध्ये मुबलक प्रमाणात पाणी आणि फायबर असते. ज्यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. पोट साफ होण्यासाठी दुधीची भाजी खायला हवी. याशिवाय कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यासाठी दुधीच्या भाजीचे सेवन फायदेशीर ठरते.
टोमॅटो –
टोमॅटोमधील अॅंटी-ऑक्सिडंट खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपयुक्त असते. त्यामुळे टोमॅटो खाल्याने किंवा त्याचा रस प्यायल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde