हल्लीच्या बदलत्या वातावरणामुळे आणि वाढत्या प्रदूषणामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमकुवत होते. त्यामुळे आपल्याला सर्दी, खोकला, त्वचेच्या समस्या सहज होऊ लागतात . हे इन्फेक्शन दूर करण्यासाठी तुम्ही काही योगासने करू शकता. या योगासनाने तुमची रोगप्रतिकारशक्ती देखील वाढेल. आज आपण जाणून घेऊयात इन्फेक्शन दूर करण्यासाठी कोणती योगासने आपण करू शकतो.
योगासने करण्याचे फायदे
या योगासनाच्या मदतीने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत मिळते. त्यामुळे ही योगासने केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होणार नाहीत.
रक्ताभिसरण चांगले होते
योगासने केल्याने आपल्या शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते. यामागचं कारण म्हणजे आपण योगासन करताना दीर्घ श्वास घेतो. ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो आणि पोषक तत्वे आणि ऑक्सिजन शरीराच्या सर्व भागांपर्यंत सहज पोहोचतात. हे शरीराला संसर्गाशी लढण्यास मदत करते.
पचनक्रिया सुधारते
जेव्हा तुमची पचनक्रिया योग्यरित्या कार्य करते. तेव्हा त्याचा तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवरही सकारात्मक परिणाम होतो. यामध्ये योग देखील महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. काही योगासने पचनक्रियेत आणि कचरा बाहेर काढण्यास मदत करतात. याचा तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर चांगला परिणाम होतो.
तणाव कमी करते
योग केल्याने आपल्याला मानसिक शांतता मिळते. ज्यामुळे तनाव देखील खूप कमी होतो. जास्त तणाव घेतल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील कमकुवत होते.परंतु योग करतानाजेव्हा तुम्ही ध्यान आणि प्राणायाम करतात. तेव्हा तुमचे शरीर आणि मन दोन्ही शांत होते. तुमचा ताण देखील कमी होतो आणि आजारी पडण्याची शक्यता देखील कमी होते.
चांगली झोप घ्या
इन्फेक्शन दूर करण्यासाठी झोप खूप महत्वाची आहे. जेव्हा तुम्ही कमी झोपता तेव्हा तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते.त्यामुळे अशा परिस्थितीत योगा करणे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. योगामुळे तुमचे शरीर आणि मन दोन्हीही आरामदायी होतात, ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप येते.
इन्फेक्शन दूर करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खालील योगासने फायदेशीर ठरू शकतात.
भस्त्रिका प्राणायाम
रक्ताभिसरण सुधारते आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत करते. फुफ्फुसांची क्षमता वाढवते, ज्यामुळे श्वसनमार्गातील संसर्ग कमी होण्यास मदत होते.
कपालभाती प्राणायाम
शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. पचनसंस्था सुधारतो आणि शरीराची स्वच्छता होते.
पश्चिमोत्तानासन
शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकतो आणि पचनसंस्थेचे आरोग्य सुधारते . तणाव कमी करून रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
हेही वाचा : Eye Health : डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी खावेत हे सुपरफूड्स
Edited By : Prachi Manjrekar