आपल्या देशात महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. खरं तर, ब्रेस्ट कॅन्सरचे निदान जेवढे लवकर होते तेवढे उत्तम असते. ज्यामुळे वेळेत उपचार करणे सोपे जाते. नुकतचं एका संशोधनात, ब्रेस्ट कॅन्सरच्या बाबतीत योगाचा सराव करणे फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी काही योगासनांची नावे सांगणार आहोत. ज्याच्या नियमित सरावाने ब्रेस्ट कॅन्सर रोखण्यासाठी मदत होते.
तिर्यक भुजंगासन –
तिर्यक भुजंगासन योगासनाचा सराव केल्याने ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो. तिर्यक भुजंगासन करण्यासाठी तुम्हाला योगा मॅटवर तळहाताचा आधार घेऊन झोपावे लागेल. यानंतर पायांमध्ये 2 फुटांचे अंतर ठेवावे. यानंतर पायांमध्ये डोके उचला आणि इनहेल करा.
शलभासन –
शलभासन योगासनाच्या सरावाने ब्रेस्ट कॅन्सर होण्यापासून रोखता येते. शलभासन करण्यासाठी खांद्याच्या खाली तळहातांनी पोटावर झोपावे. यानंतर पाय एकत्र ठेवा आणि बोटे बाहेरच्या बाजूला ठेवावीत. श्वास घ्या आणि उजवा हात वर करा आणि डावा पाय मागे घ्यावा. आपले डोके व छाती वर उचलताना श्वास सोडत शरीर खाली आणा. दुसऱ्या बाजुनेही अशीच कृती करावी.
सर्पासन –
सर्पासन सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरसाठी प्रभावी मानले जाते. यासाठी तुम्हाला पोटावर झोपावे लागेल. श्वास घेत शरीर वरच्या बाजूस उचला आणि हात पाठीमागे ठेवा. फक्त आपले पाय जमिनीपासून वर उचलू नका.
नौकासन –
नौकासन करण्यासाठी पाठीवर झोपून घ्यावे. यासाठी दोन्ही हात मांडीच्या पुढे असले पाहीजेत आणि शरीर सरळ रेषेत असावे. यानंतर शरीर सैल सोडा आणि श्वासावर लक्ष केंद्रीत करा. श्वास घेताना डोके, पाय आणि शरीर 30 अंशावर पर्यत उचला. हळूहळू श्वास घ्या आणि सोडा. पुन्हा हीच कृती 2 ते 3 वेळा करावी.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde