घरलाईफस्टाईलसिद्धार्थ सारख्या तरुणांमध्ये का बळावतोय हृद्यविकार ? ही आहेत कारणे

सिद्धार्थ सारख्या तरुणांमध्ये का बळावतोय हृद्यविकार ? ही आहेत कारणे

Subscribe

अभिनेता आणि बिग बॉस १३ विजेता सिद्धार्थ शुक्ला याचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अवघ्या ४० वर्षाच्या सिद्धार्थची ही एक्झिट मनोरंजन क्षेत्रातीलच नाही तर सामान्य नागरिकांच्याही मनाला चटका लावून गेली. याचपार्श्वभूमीवर, सिद्धार्थच्या मृत्यूने पुन्हा एकदा तरुणांमध्ये वाढणाऱ्या हृदयविकारांकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

हल्लीच्या तरुणांप्रमाणेच सिद्धार्थही फिटनेसच्या बाबतीत जागृक होता. मित्रांमध्ये फिटनेसवर तो भरभरून बोलायचा. शिवाय तो खाण्यापिण्याच्या बाबतीतही सर्तक असायचा. त्याच्या त्याच फिट बॉडी बिल्डिंगवर तरुणी घायाळ व्हायच्या. तर अनेक तरुण त्याच्या फिटनेसला फॉलोही करायचे. पण असे असतानाही त्याचा अवघ्या ४० व्या वर्षी हृद्यविकाराने मृत्यू झाला.

- Advertisement -

सामान्यपणे हृद्याशी संबंधित आजार हे वयोमानानुसार आणि मानसिक ताण व आरोग्याच्या इतर गंभीर गुंतागुंतीमुळे जडतात. पण गेल्या काही वर्षात हृद्यविकार तरुणांमध्ये अधिक प्रमाणात जडताना दिसत आहेत. यात २० वर्षांपासून ३५ वर्षांमधील तरुणांची संख्या अधिक आहे. विशेष म्हणजे हृदयविकाराशी संबंधित कुठलीही तक्रार नसणाऱ्यांना देखील हृदयविकाराचा झटका आल्याचे व त्यात त्यांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना गेल्या काही महिन्यात घडल्या आहेत. यात अनेक तरुण सेलिब्रिटीजबरोबर सामान्य तरुणही आहेत. यामागची नेमकी कारणं जाणून घेणं महत्वाचे आहे.

धूम्रपान-मदयपान
धूम्रपान किंवा मद्यपान करणं हे आजच्या तरुण तरुणींच्या लाईफस्टाईलचा एक भाग आहे. वेळीअवेळी जेवणं, कमी झोप, मिळेल ते खाणं यामुळे तरुणांमध्ये हृद्याशी संबंधित विकार वाढत आहेत.

- Advertisement -

कामाचा ताण
हृद्यविकार जडण्याच्या अनेक कारणांपैकी कामाचा ताण हे देखील एक प्रमुख कारण आहे. मनावर ताण असेल तर साहजिकच त्याचा थेट परिणाम रक्ताभिसरणावर होतो. यामुळे रक्तवाहीन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. परिणामी हृदयाला रक्तपुरवठा होत नाही. यामुळे देखील हृदयावर ताण य़ेऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

स्टेरॉईड
तरुणांमध्ये सध्या फिटनेसचे क्रेझ आहे. यासाठी अनेक तरुण तरुणी जिममध्ये तासनतास वर्कआऊट करतात. यामुळे अनेक जिममध्ये या तरुणांना या बर्न कॅलरिज डाएटमधून मिळवण्यासाठी सप्लिमेंट डाएट घेण्याचा सल्ला दिला जातो. मग यासाठी तरुण प्रोटीनची मात्रा अधिक असलेला डाएट फॉलो करतात. एम्बॉलिक स्टिरॉइड्स सारख्या उत्पादनांचा वापर करतात. याचा थेट परिणाम फक्त हृदयवरचं नाही तर किडनीवरही होतो.

जंक फूड

हल्लीच्या मुलांना झटपट मिळणारं चटपटीत जंक फूड खाण्याचं व्यसनचं लागल आहे. पण जीभेचे चोचले पुरवणाऱ्या या जंक फूडच्या सेवनामुळे शरीरावर दुष्परिणाम होतात. कॅलरीज वाढल्याने कॉलेस्ट्रॉल वाढते. ज्यामुळे हृदयावर ताण येतो आणि हृदयाशी संबंधित व्याधी बळावतात.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -