हल्ली बरेच विद्यार्थी पार्टटाइम जॉब करून कॉलेजचे शिक्षण पूर्ण करतात. शिक्षण पूर्ण करताना पार्टटाइम जॉब केल्याने फायनॅशियली स्टेबल होता येतेच शिवाय शिकताना कामाचा अनुभवही मिळतो. त्यामुळे हल्ली कित्येक विद्यार्थी शिकताना पार्टटाइम जॉब करतात. पण, जॉब आणि अभ्यास या दोन्ही गोष्टी मॅनेज करणे तितकं सोपे नाही. अनेकदा कामाच्या व्याप्यातून अभ्यासाला वेळ मिळत नाही. अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पार्टटाइम जॉब आणि अभ्यासाचे मॅनेजमेंट कसे साध्य करावे यासंदर्भातील टिप्स सांगत आहोत.
- काम आणि अभ्यास या दोघांचा ताळमेळ साध्य करण्यासाठी तुम्ही पार्टटाइम जॉबची निवड करताना कामाच्या तास किती आहेत हे पाहायला हवे.
- कोणताही विचार न करता जर तुम्ही पार्टटाइम जॉबची निवड केलीत तर अभ्यासाला वेळ काढणे कठीण होऊ शकते.
- अभ्यासासोबत काम करताना एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, तुम्ही दिवसाते शेड्युल बनवायला हवे.
- दिवसाचे शेड्युल तयार केल्याने अभ्यास आणि काम दोन्ही गोष्टी व्यवस्थितरीत्या हाताळता येतात.
- हल्ली कितीतरी स्मार्ट ऍप आले आहेत, ज्याचा वापर तुम्ही पार्टटाइम जॉब आणि अभ्यास मॅनेज करण्यासाठी करू शकता.
- स्मार्ट ऍपच्या मदतीने तुम्हाला वेळेचं गणित व्यवस्थितरित्या आखता येईल.
- या ऍपमध्ये दिवसातील छोटे छोटे कशी करायची याबद्दल टिप्स देण्यात आलेल्या असतात.
- काहीवेळा पार्टटाइम जॉब आणि अभ्यास मॅनेज करताना स्ट्रेस निर्माण करणारी परिस्थिती येते. यामुळे कामावर आणि अभ्यासावर व्यवस्थित लक्ष केद्रींत करता येत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही स्वत:ला मोटीवेटेड करायला हवे.
- पार्टटाइम जॉबची निवड करताना योग्यरित्या करावी, जेणेकरून तुमचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होणार नाही.
- पार्टटाइम जॉब घराजवळचा निवडावा. असे केल्याने येण्याजाण्याला अधिक वेळ खर्च होणार नाही.
- घराजवळचा काम शोधल्याने अभ्यासासाठी वेळ मिळतो. ज्यामुळे कामात आणि अभ्यासात प्रगती साधता येते.
- Advertisement -
- Advertisement -
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde