घरलाईफस्टाईल'या' ब्लड ग्रुपवाल्यांनी मांसाहार टाळलेलाच बरा; वाचा सविस्तर

‘या’ ब्लड ग्रुपवाल्यांनी मांसाहार टाळलेलाच बरा; वाचा सविस्तर

Subscribe

कित्येकदा पौष्टिक आहार घेतल्यानंतरही बर्‍याचदा लोकांचे आरोग्य चांगले राहत नसल्याचे दिसून येत आहे. यामागे बरीच कारणे असू शकतात, परंतु याचे एक मूख्य कारण असून प्रसिद्ध निसर्गोपचार जेडी अ‍ॅडोमो यांनी स्पष्ट केले आहे. तज्ज्ञांचे असे मत आहे की, जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या रक्तगटानुसार आपल्या आहार घेतला तर नक्कीच त्याच्या आरोग्यास मोठे फायदे होतात. व्यक्तीच्या रक्तगटानुसार घेतलेला आहार त्याच्या शरीरास योग्य रितीने पचण्यास सक्षम ठरतो. WebMD च्या अहवालानुसार, प्रत्येक रक्तगटाचे स्वतःचे विशिष्ट स्वरूप असते. म्हणूनच आपल्या खाण्यापिण्याचा थेट संबंध हा रक्त गटाशी असतो. रक्त गटांचे चार प्रकार असतात ते म्हणजे O, A, B आणि AB. कोणते रक्तगट असणाऱ्या व्यक्तीने कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत ते जाणून घ्या…

A ब्लड ग्रुप असणाऱ्यांनी काय खावे?

ओ ब्लड ग्रुपच्या लोकांनी जास्त प्रोटीन आहार घ्यावा. यामध्ये मसूर, मांस, मासे, फळे इत्यादी अनेक गोष्टींचा समावेश आहे. तुमच्या आहारात धान्य आणि कडधान्यांसह शेंगांचे प्रमाण संतुलित ठेवणं आवश्यक आहे. या सर्व गोष्टी तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील.

- Advertisement -

A ब्लड ग्रुप असणाऱ्यांनी काय खावे?

हिरव्या भाज्या व्यतिरिक्त, ए ब्लड ग्रुप असलेल्या लोकांच्या आहारात टोफू, सीफूड आणि विविध प्रकारच्या डाळींचा समावेश असावा. ए ब्लड ग्रुप असणारे लोकं ऑलिव्ह ऑईल, दुधाचे पदार्थ, कॉर्न आणि सीफूडचा वापर करून त्यांचा योग्य आहार घेऊ शकतात.

A ब्लड ग्रुप असणाऱ्यांनी काय खाऊ नये?

तज्ज्ञांच्या मतानुसार, ए ब्लड ग्रुप असणाऱ्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती अत्यंत संवेदनशील असते, म्हणूनच त्यांनी त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घ्यावी. या ब्लड ग्रुपच्या लोकांनी कमी खावे कारण त्यांनी अधिक खाल्लेले अन्न सहज पचत नाही. A ब्लड ग्रुप असणाऱ्यांनी चिकन-मटणचा समावेश आहारात कमी केला पाहिजे.

- Advertisement -

B ब्लड ग्रुप असणाऱ्यांनी काय खावे?

बी ब्लड ग्रुप असणारे लोक सर्वात भाग्यवान आहेत. या रक्तगटाच्या लोकांना जास्त काही खाणं टाळावे लागत नाही. हिरव्या पालेभाज्या, फळे, मासे, मटण आणि चिकनचे सर्व काही खाऊ शकता.

B ब्लड ग्रुप असणाऱ्यांनी ही काळजी घ्या

तज्ज्ञांच्या मते, या रक्तगटाच्या लोकांची पाचन शक्ती खूप चांगली असते, ज्यामुळे त्यांच्या शरीरात चरबी जमा होत नाही. हे लोक भरपूर दूध आणि त्यापासून बनवलेले पदार्थ, अंडी इत्यादींचे सेवन करू शकतात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की त्यांच्या खाण्याच्या सवयींवर योग्य ते नियंत्रण ठेवले पाहिजे.

AB ब्लड ग्रुप असलेल्यांनी घ्या संतुलित आहार

एबी ब्लड ग्रुप फार कमी लोकांमध्ये आढळतो. ज्या गोष्टी A आणि B ब्लड ग्रुप असणाऱ्यांना जेवणात टाळण्यासाठी सांगितल्या जातात त्यांनी गोष्टी खाण्यात देखील AB ब्लड ग्रुप असणाऱ्यांनी खाताना सावधगिरी बाळगली पाहिजे. AB ब्लड ग्रुप असलेल्या लोकांना जास्त फळे आणि भाज्या खाव्यात.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -