Sunday, March 16, 2025
HomeमानिनीHealth Tips : न्यू मॉमसाठी हे डाएट बेस्ट

Health Tips : न्यू मॉमसाठी हे डाएट बेस्ट

Subscribe

आई होणं ही खूप खास आणि जबाबदारीची गोष्ट आहे. हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अविस्मरणीय टप्पा असतो. या दरम्यान प्रत्येक गोष्टीची आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते. बाळाच्या वाढीसाठी आणि स्वतःच्या आरोग्यासाठी योग्य आहार घेणं अत्यंत गरजेचे आहे . योग्य आहारामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल, शरीर लवकर सशक्त होईल, आणि स्तनपानासाठीही मदत होईल. आज आपण या लेखातून न्यू मॉमसाठी कोणतं डाएट बेस्ट आहे ते जाणून घेऊयात.

चांगले पोषण मिळवण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा

भरपूर पोषण असलेले पदार्थ

तुम्ही आहारात जास्त प्रोटीन असलेल्या पदार्थांचा समावेश करू शकता. दुध, दही, पनीर, डाळी, राजमा, मटण, मासे, या पदार्थामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटिन्स आणि कॅल्शियम देखील मिळेल. तसेच तुम्ही जास्त आयर्न असलेले पदार्थ म्हणजे हरभरा, पालक, बीट, तीळ यांचा समावेश देखील करू शकता. फळांमध्ये संत्री, मोसंबी, इत्यादी पदार्थांचा आहारात समावेश करा.

दूध आणि स्तनपान वाढवणारे पदार्थ

हिरव्या भाज्यांमध्ये पालक, काळे आणि मोरिंगा यांसारख्या पालेभाज्या कॅल्शियम, लोह आणि फोलेट सारख्या आवश्यक पोषक तत्वांनी युक्त असतात. हे पोषक घटक आई आणि बाळ दोघांसाठीही आवश्यक असतात. आपल्या आहारात या हिरव्या भाज्यांचा समावेश केल्याने संपूर्ण आरोग्यास मदत होऊ शकते आणि दुधाचे उत्पादन वाढू शकते.

पचनासाठी चांगले पदार्थ

न्यू मॉमसला आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते त्यामुळे लवकर पचणारे अन्न त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल. ताजे घरगुती अन्न हे पचायला देखील सोपे असतात. तसेच तुम्ही सूप किंवा ताक देखील घेऊ शकता. जास्त फायबरयुक्त असलेलले पदार्थ म्हणजे ओट्स, संपूर्ण धान्य, फळे यांचा समावेश डाएटमध्ये करू शकता.

भरपूर पाणी प्या

पाणी आपल्या शरीरासाठी अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे जास्तीत जास्त हायड्रेटेड राहा. दिवसाला किमान 8-10 ग्लास पाणी प्या.

हे पदार्थ टाळा

  • जास्त तळलेले, मसालेदार पदार्थ शक्यतो टाळा.
  • कोल्ड्रिंक्स, फास्ट फूड
  • चहा, कॉफी हे जास्त कॅफिनयुक्त असल्यामुळे हे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

न्यू मॉमस डाएटमध्ये या पदार्थांचा समावेश करू शकता.

हेही वाचा : Lung Cancer Precautions : धूम्रपान न करणाऱ्यांनाही होऊ शकतो लंग्स कॅन्स


Edited bY : Prachi Manjrekar

Manini