Eco friendly bappa Competition
घर दिवाळी २०२१ यंदा दिवाळीत घरच्या घरी तयार करा सुगंधी उटणे

यंदा दिवाळीत घरच्या घरी तयार करा सुगंधी उटणे

Subscribe

दिवाळीच्या दिवशी पहाटे लवकर उठून उटणे लावून अभ्यंगस्नान करण्याची प्रथा पूर्वीपासून सुरु आहे. पूर्वीचे लोक घरच्या घरी पारंपारिक पद्धतीने उटणं तयार करायचे. मात्र, अलीकडे लोक बाजारातून उटणं खरेदी करतात. परंतु तुम्ही देखील घरच्या घरी स्वच्छ आणि सुवासिक उटणे तयार करु शकता.

साहित्य :

  • बेसन 2 चमचे
  • चंदन पावडर 2 चमचे
  • हळद पावडर 1/2 चमचा
  • चिमुटभर भीमसेन कापूर
  • पाणी / गुलाबजल / दूध (यापैकी एक वापरा)
- Advertisement -

कृती :


सर्वप्रथम बेसन, चंदन पावडर, हळद पावडर आणि कापूर यांचे पाणी अथवा गुलाबजल अथवा दूध वापरून थोडे घट्ट मिश्रण बनवा. ते एकसारखे तुमच्या चेहऱ्यावर आणि हातापायांवर लावा. 10-15 मिनिटे तसेच ठेवा. नंतर पाण्याने धुवून काढा.


- Advertisement -

हेही वाचा :

दिवाळीत अशा प्रकारे करा घराची सजावट, होईल सकारात्मक परिणाम

- Advertisment -