Omicron Variant: ओमिक्रॉनवर मात करण्यासाठी प्रतिकारकशक्ती करायची आहे मजबूत?, तर प्या ‘हे’ पेय

this drink to beat the Omicron Variant and boosting immunity
Omicron Variant: ओमिक्रॉनवर मात करण्यासाठी प्रतिकारकशक्ती करायची आहे मजबूत?, तर प्या 'हे' पेय

रोग प्रतिकारकशक्ती (Immunity) शरीराला कोणत्याही व्हायरससोबत लढण्यासाठी आणि आजारांपासून सुरक्षित ठेवण्यास मदत करते. कोरोनाच्या काळात रोग प्रतिकारकशक्ती मजबूत ठेवणे खूप आवश्यक आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनची बऱ्याच जणांना लागण होत आहे. त्यामुळे ओमिक्रॉनची लागण होण्यापासून बचाव करू शकते ते म्हणजे मजबूत रोग प्रतिकारकशक्ती. प्रतिकारकशक्ती वाढण्यासाठी डाएट, व्यायाम, लाईफस्टाईल आणि झोप खूप महत्त्वाची असते. एकाबाजूला कोरोना व्हेरिएंटचा फैलाव वेगाने होत असला तरी दुसऱ्या बाजूला व्हायरस आणि व्हेरिएंटपासून सुरक्षित राहण्यासाठी स्वतःला फिट आणि निरोगी ठेवणे हे लोकांचे प्राधान्य झाले आहे. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी दररोज ३० मिनिटे व्यायामासोबत चांगले खाणे खाल्ले पाहिजे. म्हणून आम्ही तुम्हाला आज अशी पेय सांगणार आहोत, ज्यामुळे शरीरात प्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होईल.

हळदी आणि मसाले दूध

हळदीमध्ये करक्यूमिन नावाचे संयुगे असतात. जे शरीरात रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत करते. त्यामुळे प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी हळदीचे दूध, ज्यामध्ये काही इतर मसालेसुद्धा घालून सेवन करू शकता.

बेडीशेप आणि तुळशीची चहा

बेडीशेपमध्ये खूप औषधी गुणधर्म असतात, जे सर्दी आणि खोकल्यापासून दिलासा देतात. तसेच याशिवाय प्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत होते. बेडीशेप आणि तुळशीची चहा बनवण्यासाठी बेडीशेप एक कप पाण्यात उकळवा. त्यानंतर तुळशीची पाने, चिमुटभर काळी मिरी आणि चवीनुसार मध घाला आणि याचे सेवन करा.

काढा

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून घरचा देशी काढा प्रतिकारकशक्ती मजबूत करण्यासाठी चांगले पेय असल्याचे म्हटले जाते. हा काढा बनवण्यासाठी एक लीटर पाणी घ्या आणि त्यामध्ये दालचीन, लवंग, तुळशी, बेडीशेप, काळी मिरी आणि हळद घालून ते उकळवा. मग त्यानंतर गॅस बंद करून पेय थंड झाल्यानंतर त्याचे सेवन करा.


हेही वाचा – Health Care Tips: जास्त प्रमाणात मनुक्याचं सेवन केल्यास शरिराचे होऊ शकते ‘हे’ गंभीर नुकसान