Saturday, February 8, 2025
HomeमानिनीHealth Tips : लो ब्लड प्रेशर रुग्णांसाठी हा व्यायाम फायदेशीर

Health Tips : लो ब्लड प्रेशर रुग्णांसाठी हा व्यायाम फायदेशीर

Subscribe

लो ब्लड प्रेशर असलेल्या लोकांसाठी योग्य प्रकारचा व्यायाम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. व्यायाम केल्याने आपलं शरीर सुदृढ राहते आपल्याला कोणत्याही प्रकारचे आजर देखील होणार नाही. व्यायाम केल्याने रक्ताभिसरण सुधारते, हृदयाची कार्यक्षमता देखील वाढते. आज आपण जाणून घेऊयात लो ब्लड प्रेशर रुग्णांसाठी कोणता व्यायाम फायदेशीर आहे.

योगासने

लो ब्लड प्रेशर रुग्ण काही योगासने करू शकतात. वज्रासन केल्याने पचन सुधारते आणि रक्तप्रवाह सुरळीत होतो. शवासन केल्याने शरीराला विश्रांती मिळते आणि रक्तदाब संतुलित राहतो. भ्रामरी आणि अनुलोम-विलोम प्राणायाम केल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि ऑक्सिजनचा योग्य पुरवठा आपल्याला शरीराला होतो.

कार्डिओ व्यायाम

हलका कार्डिओ व्यायाम लो ब्लड प्रेशर रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. 20-30 मिनिटे चालल्याने रक्ताभिसरण सुधारते.सायकलिंग हा उत्तम कार्डिओ आहे. स्नायूंना ताकद मिळते आणि रक्तप्रवाह सुरळीत होतो. स्विमिंग केल्याने संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो.

स्ट्रेंथ ट्रेनिंग

स्ट्रेंथ ट्रेनिंग ही हलक्या वजनांसह केली जाते. यामुळे स्नायू मजबूत होतात आणि त्यांची सहनशक्ती वाढते. यामुळे हाडे मजबूत होतात आणि फ्रॅक्चरचा धोका कमी होतो. यामुळे सांध्याची लवचिकता टिकून राहते.

व्यायाम करताना या गोष्टींची काळजी घ्या

  • झटकन उठणे किंवा उभे राहणे टाळा
  • उष्ण हवामानात जास्त श्रम होईल असे व्यायाम टाळा
  • जास्त झपाट्याने चालणे किंवा रनिंग टाळा
  • व्यायामापूर्वी आणि नंतर भरपूर पाणी प्यावे
  • जर रक्तदाब खूप कमी असेल आणि व्यायामादरम्यान चक्कर येत असेल, तर  डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

हेही वाचा : Laughing : खळखळून हसण्याचे आहेत फायदे


Edited By : Prachi Manjrekar

Manini