Monday, January 6, 2025
HomeमानिनीHealth Tips : लोअर बॉडीसाठी हे व्यायाम आहे फायदेशीर

Health Tips : लोअर बॉडीसाठी हे व्यायाम आहे फायदेशीर

Subscribe

आपण वर्कआउट करताना लोअर बॉडीचा वर्कआउट देखील करतो. व्यायाम करताना आपण वेगवेगळ्या प्रकारचे वर्कआउट करतो. लोअर बॉडीसाठीचे व्यायाम म्हणजे पाय, नितंब, मांडी आणि पोटरी यांसारख्या शरीराच्या खालच्या भागातील स्नायू बळकट करण्यासाठी हे व्यायाम केले जातात. या व्यायामामुळे शरीर लवचिक आणि मजबूत राहते, आज आपण लोअर बॉडीसाठी कोणते व्यायाम फायदेशीर आहे ते जाणून घेऊयात.

स्क्वॅट्स

स्क्वॅट्स हा स्नायू मजबूत करण्यासाठी चांगला व्यायाम आहे. शरीरातील चरबी कमी करण्याचा हा सर्वात योग्य मार्ग आहे. स्क्वॅट्स केल्याने मांडी, हॅमस्ट्रिंग, नितंब, पोट, यांचे स्नायू मजबूत होतात. तसेच कॅलरीज जास्त बर्न होतात, त्यामुळे वजन नियंत्रित राहते.

- Advertisement -

लंज वर्कआऊट

आपल्या शरीराच्या कमरे खालील भागाला तसेच स्नायूंना मजबूत करण्यासाठी खास लंज वर्कआऊट किंवा एक्सरसाइज केले जातात. लेज वर्कआऊट केल्यामुळे आपले शरीर लवचिक बनते त्याचबरोबर आपला स्ट्रेसदेखील कमी होतो.

लेग रेज

लेग रेज हा एक स्ट्रेंथ व्यायाम हिप्स आणि कोर मजबूत करण्यासाठी केले जाते. यामुळे लोअर बॅकचा त्रास कमी होतो.

- Advertisement -

हिप ब्रिज

ग्लूट्स, लोअर बॅक आणि हिप्स मजबूत करते. हिप ब्रिज व्यायामाला ग्लूट ब्रिज किंवा हिप रेझ असेही म्हणतात. यामुळे, ग्लूटस मॅक्सिमस आणि क्वाड्रिसेप्स या स्नायूंचा वापर होतो.हिप्सवर जमा झालेली चरबी या व्यायामुळे कमी होते.

या महत्वाच्या टिप्स लक्षात ठेवा

  • व्यायाम करताना योग्य फॉर्म आणि तंत्र वापरणे गरजेचे आहे.
  • आठवड्यातून किमान 3-4 वेळा लोअर बॉडी व्यायाम करा.
  • गरजेनुसार वॉर्मअप आणि स्ट्रेचिंगला प्राधान्य द्या.

लोअर बॉडी व्यायामाचे फायदे 

  • स्नायूंची ताकद वाढते.
  • वजन कमी करण्यात मदत होते.
  • घुटण्या, कंबर आणि पायांचे दुखणे कमी होते.
  • रोजच्या हालचालीत सुधारणा होते.

हेही वाचा : Pregnancy Care : प्रेग्नन्सीमध्ये चालणे महत्त्वाचे का ?


Edited By : Prachi Manjrekar

- Advertisment -

Manini