वयाच्या पन्नाशीनंतर आपल्याला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. या दरम्यान शरीरात अनेक शारीरिक बदल होत असतात. शरीर कमकुवत व्हायला सुरूवात होते तसेच स्नायूंमध्ये ताकद कमी होणे, तसेच रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्यासारख्या समस्या निर्माण होतात. बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव आणि हार्मोन्समधील घट त्यामुळे पन्नाशीनंतर शरीराची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. आरोग्य सुदृढ राहण्यासाठी तुम्ही काही व्यायाम करू शकता. आज आपण जाणून घेऊयात,पन्नाशीनंतर कोणत्या व्यायामाने पन्नाशीनंतर जीवन सुदृढ होईल.
चालणे
दररोज कमीतकमी 30-45 मिनिटे चालण्याची सवय ठेवा. नियमित चालल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते, सांधेदुखी कमी होते आणि शारीरिक ऊर्जा वाढते.
योगासने
योग शरीराला लवचिक बनवण्याचे काम करते. ताणतणाव देखील कमी होतो. तुम्ही ताडासन, वृक्षासन, भुजंगासन हे उपयुक्त योगासने करू शकता.
स्ट्रेचिंग
दिवसाची सुरुवात हलक्या स्ट्रेचिंगने केल्यास स्नायूंचे लवचिकपणा टिकून राहतो आणि सांधे मजबूत होतात.त्यामुळे तुमच्या सांधे दुखी किंवा पाठ दुखीच्या समस्या दूर होतील.
प्राणायाम
श्वसनाचे व्यायाम आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. याने आपले हृदय देखील निरोगी राहते. या व्यायामामुळे फुफ्फुसे चांगली राहतात.
सायकलिंग
सायकल चालवल्याने आपल्याला कोणतेही आजर होत नाही. दररोज सायकल चालवल्याने स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका आणि उच्च रक्तदाब यांसारख्या हृदयाशी संबंधित समस्या टाळण्यास मदत होते.
ध्यान
शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्याची काळजी घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. मन शांत ठेवण्यासाठी आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान हा सर्वोत्तम उपाय आहे.त्यामुळे तुम्ही काही वेळ ध्यान केल्याने तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहील.
या महत्वाच्या टिप्स लक्षात ठेवा
- व्यायाम सुरू करण्याआधी वार्म-अप करा.
- दररोज कमीतकमी 7-8 तासांची झोप घ्या.
- संतुलित आहार घेण्यावर भर द्या.
- या व्यायामशैलीमुळे पन्नाशीनंतरही जीवन निरोगी आणि सक्रिय राहील.
हेही वाचा : Health Tips : PCOS मुळे दात खराब होतात का?
Edited By : Prachi Manjrekar