डिप्रेशन किंवा नैराश्य या मानसिक आजारांबद्दल बहुतांश लोकांना व्यवस्थितीत कळत नाही. जर एखादा व्यक्ती नैराश्याने ग्रस्त असेल तर त्याने काय खाल्ले पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे याकडे लक्ष द्यावे. नैराश्याची कारणे आणि लक्षणं लक्षात घेता तुम्ही तुमच्या आहारात काही बदल केला पाहिजे. आहारात अशा काही फूड्सचा समावेश करा ज्यामुळे तुम्हाला तणावाच्या स्थितीतून बाहेर पडण्यास मदत होईल.
-कॅमोमाइल
काही लोक कॅमोमाइल चहाचे सेवन करातात. कारण यामध्ये सूज कमी करणे, अँन्टीबॅक्टेरियल आणि आराम देणारे गुण असतात. असे मानले जाते की, कॅमोमाइल मध्ये असलेले फ्लेवोनॉइड्सच्या कारणास्तव तुम्ही तणावाच्या स्थितीपासून थोडंफार दूर राहता. कॅमोमाइल हे टेंन्शनची लक्षणं कमी करतात.
-दही
दह्यात लॅक्टोबेसिलस आणि बिफिडोबॅक्टेरियल नावाचे हेल्दी बॅक्टेरिया असतात. काही अभ्सासातून असे समोर आले आहे की, हे दोन्ही बॅक्टेरिया मेंदूवर सकारात्मक परिणाम करतात. दररोज दह्याचे सेवन केल्याने टेंन्शन, नैराश्य आणि स्ट्रेस कमी होण्यास मदत होते.
-ग्रीन टी
ग्रीन टी मध्ये थायमिन नावाचे अमीनो एसिड असते, आपल्या मूड संदर्भातील विकार ठिक करण्यास मदत करतात. थायमिनमध्ये नैराश्य कमी करणारे गुण असतात. त्याचसोबत सेरोटोनिन आणि डोपामाइन प्रोड्युसमध्ये ही वाढ होते. नैराश्यापासून दूर राहण्यासाठी तुम्ही ग्रीन टी पिऊ शकता.
-भोपळ्याच्या बिया
भोपळ्याच्या बियांमध्ये पोटॅशियम असते. जे शरिरात इलेक्ट्रोलाइटला संतुलित ठेवणे आणि ब्लड प्रेशरला नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. या बिया स्ट्रेस आणि चिंतेची लक्षण कमी करण्यास ही मदत करतात.
-मासे
जर तुम्ही मासांहारी असेल तर डिप्रेशनमध्ये मासे खाऊ शकता. डिप्रेशनपासून दूर राहण्यासाठी साल्मन, मॅकरेल, सारदिंस आणि ट्युना मासा खाल्ला पाहिजे. यामध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा-3 फॅट असते जे मेंदूच्या कोशिकांमध्ये संबंध ठेवण्यास मदत करतात आणि न्युरोट्रांसमीटरसाठी रिसेप्टर नाड्यांना बळकटी देतात.
-सुका मावा
काजू, अक्रोड यामध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड असतात. अक्रोड तुमच्या मेंदूचे हेल्थ राखण्यास फार मदत करतो. कारण यामध्ये पुरेशा प्रमाणात ओमेगा-3 असते. हे प्रोटीनचे उत्तम स्रोत सुद्धा आहेत. त्यामुळे ब्लड शुगरचा स्तर संतुलित राहण्यास मदत होते.
हेही वाचा- पोटदुखीपासून ‘हे’ पदार्थ देतील आराम