स्त्रीच्या आरोग्यासाठी योग्य आहार खूप महत्वाचा असतो. योग्य आहारामुळे शरीर सुदृढ राहते. तसेच शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते. काही पोषक घटकांचे सेवन अधिक महत्त्वाचे ठरते. हे पदार्थ केवळ आरोग्य सुधारण्यात मदत करत नाहीत, तर हार्मोनल संतुलन राखण्यास तसेच पाळीच्या काळातील वेदना कमी करण्यास आणि ऊर्जा पातळी वाढवण्यासाठीही उपयुक्त ठरतात.आज आपण जाणून घेऊयात कोणते पदार्थ महिलांसाठी उत्तम आहे.
डाळी, कडधान्ये
मूग डाळ, हरभरा, मसूर डाळ, राजमा, चणा यामध्ये मोठ्या प्रमाणात, फायबर आणि प्रथिने असतात. मासिक पाळी दरम्यान या पदार्थांचे सेवन केल्याने त्रास कमी होऊन आराम मिळतो.
फळे आणि भाज्या
केळी, सफरचंद, संत्रे, पपई, बेरी फळे हिरव्या पालेभाज्यांमध्ये गाजर, बीट, टोमॅटो, ब्रोकोली या फळे आणि भाज्यांमध्ये फोलेट, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियमसह जीवनसत्त्वे आणि खनिजे इत्यादींचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे फळे आणि भाज्या खाल्याने महिलांची प्रतिकारशक्ती वाढते. कोणतेही आजार देखील होत नाही.
दुग्धजन्य पदार्थ
दूध, दही, ताक, पनीर या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. बऱ्याच महिलांमध्ये कॅल्शियम कमी असते. त्यामुळे दुग्धजन्य पदार्थांचे जास्त सेवन केल्याने कॅल्शियमची कमी दूर होईल.
ड्रायफ्रुटस
बदाम, अक्रोड, काजू, खजूर फ्लॅक्स सीड्स यामुळे महिलांचे हार्मोन्स बॅलन्स राहते. बऱ्याचदा महिलांच्या हार्मोन्समध्ये बदल होत असतात. अशावेळी हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी ड्रायफ्रुटस उत्तम स्रोत आहे.
मासे आणि अंडी
माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि इतर जीवनसत्त्वे असतात, तर अंडी प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे देतात. , ज्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते.
डार्क चॉकलेट
बऱ्याच महिलांना मासिक पाळीच्यावेळी खूप वेदना होत असतात. अशावेळी डार्क चॉकलेट खाल्याने या वेदनांपासून आराम मिळेल आणि मूड देखील चांगला राहतो.
हे सर्व पदार्थ महिलांसाठी उत्तम आहे.
हेही वाचा : Pregnancy Care Tips : प्रेग्नन्सीमध्ये या कॉस्मेटीकपासून राहावे दूर
Edited By : Prachi Manjrekar