स्किनकेर करण्याआधी आपल्या त्वचेचा प्रकार जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. आपल्या त्वचेचा प्रकार आपल्याला माहित असेल तर त्याप्रमाणे आपण स्किनकेर करू शकतो. बऱ्याचदा त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती वस्तू वापरतात. अनेकांना असे वाटते या घरगुती उपायांनी त्वचेचे कोणतेही नुकसान होणार नाही. परंतु असे नाही . जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्हाला त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. जर तुम्ही कोरड्या त्वचेची काळजी घेण्यासाठी स्क्रब बनवत असाल तर तुम्ही काही गोष्टी टाळल्या पाहिजेत.आज आपण जाणून घेऊयात ड्राय स्किनसाठी कोणते होममेड स्क्रब बेस्ट आहे.
लिंबू आणि मीठ स्क्रब
स्क्रब बनवताना, आपण बऱ्याचदा लिंबू आणि मीठचा वापर करतो. परंतु जर तुमची त्वचा कोरडी असेल तर हे स्क्रब वापरणे टाळा. लिंबू खूप आम्लयुक्त असते. आणि ते थेट त्वचेवर लावल्याने त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते. तसेच मीठ तुमची त्वचा आणखी कोरडी, संवेदनशील आणि चिडचिडी बनवू शकते.म्हणून कोरड्या त्वचेसाठी स्क्रब बनवताना, लिंबूऐवजी मध किंवा दूध सारख्या घटकांचा वापर करू शकता.तुम्ही बारीक वाटलेले ओट्स किंवा बदामाचे पीठ घालून हायड्रेटिंग स्क्रब तयार करू शकता.
कॉफी स्क्रब
कोरड्या त्वचेसाठी कॉफी स्क्रब वापरणे चांगले मानले जात नाही. यामागचं कारण म्हणजे कॉफी ग्राउंड्सचा पोत खूपच खडबडीत असतो, जो तुमच्या कोरड्या त्वचेला खूप त्रास देऊ शकतो. तसेच तुमच्या त्वचेतील ओलावा संतुलन देखील बिघडू शकते. ज्यामुळे तुमची त्वचा आणखी कोरडी आणि निस्तेज दिसू शकते. त्यामुळे कोरड्या त्वचेवर कॉफी स्क्रब वापरणे टाळावे. त्याऐवजी कॉफी-इन्फ्युज्ड तेल तुम्ही वापरू शकता.
बेकिंग सोडा स्क्रब
ड्राय स्किनसाठी बेकिंग सोडा स्क्रब वापराने खूप हानिकारक ठरू शकते. बेकिंग सोड्यामध्ये खूप जास्त pH असते. हे तुमच्या त्वचेसाठी घातक ठरू शकते. तुमची त्वचा आणखी कोरडी वाटू शकते. याव्यतिरिक्त, तुम्हाला त्वचेची लालसरपणा, जळजळ आणि कधीकधी पुरळ देखील येऊ शकतात. म्हणून, बेकिंग सोडाऐवजी, ग्राउंड ओट्स किंवा बदाम पावडर वापरून स्क्रब बनवा आणि ते वापरा. हे तुमच्या त्वचेच्या हायड्रेशनची काळजी घेण्यास मदत करेल.
हेही वाचा : Health Tips : चांगल्या झोपेसाठी करा एक्सरसाइझ
Edited By : Prachi Manjrekar