Sunday, August 1, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर लाईफस्टाईल तुम्ही जास्त केळं खात असाल तर तुमच्यासाठी हा धोक्याचा इशारा आहे!

तुम्ही जास्त केळं खात असाल तर तुमच्यासाठी हा धोक्याचा इशारा आहे!

Related Story

- Advertisement -

केळी हे सर्वांना आवडणारं आणि सर्वांच्या खिशाला परवडणारं एक फळ. केळी बाराही महिने बाजारात उपलब्ध असतात. शक्तीवर्धक फळ असल्याने त्याचे अनेक फायदेही आहेत. दररोज एक केळी खाल्ल्याने आपण अनेक आजारांपासून सुरक्षित राहू शकतो. व्हिटॅमिन, प्रोटिन आणि इतर पोषक तत्व तसेच अँटी-ऑक्सिडेंट असल्याने ते आपल्या शरीराचे योग्य पोषण करतात. केळीमुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी सामान्य करण्यास तसेच पचनक्रिया सुधारण्यास मदत होते . केळाचे आरोग्यविषयक फायदे पाहता, बहुतेक आरोग्य तज्ज्ञ दैनंदिन आहारात एक केळं नियमित खाण्याचा सल्ला देतात. मात्र याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने त्याचे दुष्परिणाम देखील होतात. तुम्हाला जास्त केळी खाण्याची आवड असेल तर हे नक्की वाचा…

वजन अचानक वाढू शकते

- Advertisement -

जर तुम्ही तुमच्या आरोग्याविषयी खूप सतर्क असाल आणि तुमच्या वजनाची काळजी घेत असाल तर केळं खातांना विचार करणं आवश्यक आहे. केळामध्ये १०५ ते ११० कॅलरी असल्याने जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुमचे वजन वाढू शकते. जर तुम्हाला अनियंत्रित वाढणाऱ्या वजनावर नियंत्रण ठेवायच असेल तर तुम्ही रोज केळं खाणं टाळणं महत्त्वपू्र्ण ठरेल.

मायग्रेनचा धोका होण्याची शक्यता

केळं हे फळ सर्वात पौष्टिक मानले जात असले तरी मायग्रेन वाढविण्यास जबाबदार ठरू शकते. केळीच्या सालीमध्ये टायरामाईन मोठ्या प्रमाणात असल्याने मायग्रेन होण्यास कारणीभूत ठरू शकतो. म्हणून जर तुम्ही मायग्रेनचे रुग्ण असाल तर जास्त केळी खाणे तुमच्यासाठी योग्य ठरणार नाही.

हायपरक्लेमिया होण्याची शक्यता

- Advertisement -

हायपरक्लेमिया स्थिती जास्त प्रमाणात पोटॅशियमच्या सेवनामुळे उद्भवते. अनेक संशोधनात असे आढळले आहे की दिवसाला १८ ग्रॅमपेक्षा जास्त पोटॅशियमचे सेवन केल्याने हायपरक्लेमियासह बर्‍याच समस्या उद्भवू शकतात. केळीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने, यामुळे मळमळ, हाय पल्स रेट, दम लागणे, हृदयाच्या ठोक्यात वाढ आणि हृदयविकाराचा झटका येण्याची परिस्थिती उद्भवू शकते.

नियमित केळी खाल्ल्यानं होतात हे फायदे

  • केळीमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने नियमित केळी खाणाऱ्या व्यक्तीला एनिमियाचा धोका नसतो.
  • केळी खाल्ल्याने मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या पोटदुखीवर महिलांना आराम मिळतो. तसेच मूड स्विंगवरही केळी फायदेशीर आहे.
  • केळी खाल्ल्याने शक्ती तर मिळतेच पण रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

 

 

- Advertisement -