घरलाईफस्टाईलअशा पद्धतीने बनवा साबुदाणा-सफरचंदाची पौष्टिक खीर

अशा पद्धतीने बनवा साबुदाणा-सफरचंदाची पौष्टिक खीर

Subscribe

साबुदाणा पचनक्रिया ठिक करुन, गॅस, अपचन आणि इतर समस्यांमध्ये लाभदायक ठरु शकतो.इतकंचं नव्हे तर उपवासात सफरचंद खाणं देखील फायदेशीर आहे.

आपल्याकडे उपवासांमध्ये प्रामुख्याने साबुदाण्याचा वापर केला जातो. साबुदाण्यामध्ये व्हिटॅमिन्स, प्रोटीन, मिनरल्स , कार्बोहायड्रेट्स यांसारखे अनेक पौष्टिक घटक असतात. उपवासाच्या काळात बरेच जण साबुदाणा खिचडी खाण्यास पसंती देतात, पण कधी कधी साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही साबुदाणा, सफरचंदाची पौष्टिक खीर नक्की खाऊन बघा. ज्यामध्ये तुम्हाला साबुदाण्याबरोबरचं सफरचंदाचे पोषकतत्त्व सुद्धा मिळतील. पोटाच्या कोणत्याही प्रकारच्या समस्येवर साबुदाणा खाणं फायदेशीर असल्याचं मानलं जातं. साबुदाणा पचनक्रिया ठीक करून गॅस, अपचन आणि इतर समस्यांमध्ये लाभदायक ठरू शकतो. इतकंच नव्हे तर उपवासात सफरचंद खाणं देखील फायदेशीर आहे. सफरचंदामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि रोगांशी लढणारे घटक असतात. सफरचंदात पेक्टिनसारखे फायदेशीर फायबर्स आढळतात. दररोज एक सफरचंद खाल्ल्याने कर्करोग, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. सफरचंदात व्हिटॅमिन सी संतुलित प्रमाणात असते.

साबुदाणा, सफरचंद खीर सामग्री

- Advertisement -

1/2 कप साबुदाणा
1/2 कप सफरचंद (चुरडलेले)
6 कप दूध
1 कप साखर
1/4 कप डाळिंबाचे दाणे
1/4 कप मिक्स ड्राई फ्रूट्स
8-10 केसराचे तुकडे
8-10 कापलेले सफरचंद
1 चमचा वेलची पाउडर

कृती

- Advertisement -

१. प्रथम साबुदाणा 1-2 तास भिजवून ठेवा. 1-2  तास झाल्यानंतर साबुदाण्यातील पाणी वेगळं करा.
२. त्यानंतर एका पातेल्यात दूध गरम करून घ्या, दूध उकळल्यानंतर त्यामध्ये साबुदाणा टाकून 2 मिनिट शिजवून घ्या.
३. ठरावीक वेळेनंतर गॅस मंद आचेवर ठेवून दुधामध्ये चुरडलेले सफरचंद आणि ड्राई फ्रूट्स टाकून मिक्स करून घ्या.
४. आता त्यामध्ये चवीनुसार साखर आणि 1 चमचा वेलची पावडर टाकून 2 मिनिटे मिक्स करून घ्या.
५. ठराविक वेळेनंतर गॅस बंद करा.
६. तयार साबुदाणा-सफरचंद खीर. केसर, मिक्स ड्राय फ्रूट्स आणि कापलेले सफरचंदाचे तुकडे टाकून सर्व करा.


हेही वाचा : मूग डाळीचे चविष्ट कबाब; आजच ट्राय करा…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -