जर आपली साडी हैवी असेल तर ज्वेलरीचे असंख्य प्रकार आपल्याला मिळतात . परंतु सिम्पल साडी असेल तर बऱ्याचदा कळत नाही कोणती ज्वेलरी यावर मॅच होईल. सिंपल साडीवर परफेक्ट ज्वेलरी निवडताना एलिगंट आणि मिनिमलिस्टिक दागिन्यांवर भर द्यावा.हलकी चेन आणि छोटे स्टड्स किंवा झुमके सोबर लूकसाठी उत्तम असतात. आज आपण जाणून घेऊयात सिम्पल साडीवर कोणती ज्वेलरी सुंदर दिसेल.
ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी
जर तुमची साडी कॉटन किंवा लिनेन असेल तर ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर झुमके स्लीक चेन आणि पेंडंट बांगड्या किंवा कडा यावर सुंदर दिसेल. तुमचा लूक देखील एलिगंट दिसेल.
पर्ल नेकलेस
आपल्या प्रत्येकाकडे सॉफ्ट सिल्क किंवा चंदेरी साडी असते. या साडीवर तुम्ही पर्ल नेकलेस आणि स्टड्स गोल्डन किंवा कुंदन झुमके सुंदर दिसतील. लूक परिपूर्ण बनवण्यासाठी साधी टिकली आणि अंगठी लावू शकता.
डायमंड ज्वेलरी
पेस्टल आणि लाइट कलर साडीसह रोझ गोल्ड किंवा डायमंड लूक ज्वेलरी सुंदर दिसेल. छोटे कानातले आणि ब्रेसलेट मल्टीलेयर चेन तुम्ही यावर स्टाइल करू शकता.
कुंदन सेट
जर तुम्ही साडी ब्लॅक, मॅरून, नेव्ही ब्लू अशा डार्क कलरमध्ये असेल तर टेंपल ज्वेलरी किंवा कुंदन सेट मोठे झुमके आणि नथ घालून स्टाइल करू शकता. हातामध्ये कडे किंवा मिनीमल बांगड्या घालू शकता.
गोल्ड प्लेटेड चोकर
साडीमध्ये तुम्हाला रॉयल लूक पाहिजे असेल तर तुम्ही गोल्ड प्लेटेड चोकर सेट निवडू शकता. तुम्हाला या प्रकारचा चोकर सेट मार्केटमध्ये किंवा ऑनलाइन सहजपणे मिळेल . याची किंमत साधारणपणे 400 ते 500 रुपयांन पर्यत मिळेल.
महत्वाच्या टिप्स
- जर तुमची साडी डार्क कलरमध्ये असेल तर टेंपल ज्वेलरी किंवा मिनिमल ज्वेलरी निवड करा.
- सिम्पल साडीवर एलिगंट ज्वेलरी निवडू शकता.
- तुम्ही साडीप्रमाणे कॉन्ट्रास्ट देखील करू शकता.
हेही वाचा : Fashion Tips : हटके लूकसाठी पर्ल इअरिंग्स बेस्ट
Edited By : Prachi Manjrekar