ऑफिससाठी योग्य ऑउटफिटची निवड करणे अत्यंत गरजेचं आहे. आपल्या ऑउटफिटने आपले व्यक्तिमत्त्व कळते लोकांचा बघण्याचा दृष्टिकोण बदलतो. बऱ्याचदा महिला ऑफिसला साडी ड्रेस किंवा कुर्ती किंवा टॉप जीन्ससोबत स्टाइल करतात. परंतु जर तुम्हाला नवीन आणि स्टायलिश लूक पाहिजे असेल तर तुम्ही काही शर्ट्सची निवड करू शकता. बऱ्याचदा आपल्या कळत नाही, कोणते शर्ट्स ऑफिससाठी बेस्ट असतील तर आज आपण या लेखातून जाणून घेऊयात ऑफिससाठी कोणते लेटेस्ट प्रिंटेड शर्ट बेस्ट आहेत.
कॉटन शर्ट
हे प्रिंटेड कॉटन शर्ट तुम्हाला स्लीव्स किंवा फूल हॅन्डमध्ये अशा दोन्ही पद्धतीमध्ये मिळेल. हे शर्ट खूप स्टयलिश आणि सुंदर दिसतात. हे तुम्ही स्कर्ट, जीन्स, ट्राऊजरसह स्टाइल करू शकता. हे शर्ट तुम्हाला सहजपणे ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ठिकाणी मिळेल. या शर्टची किंमत साधारणपणे 400 ते 500 रुपयांपर्यत मिळेल.
सॅर्टन शर्ट
हल्ली सॅर्टन शर्ट खूप ट्रेंडिंग आहे. हे शर्टस ऑफिससाठी उत्तम आहे. हे शर्ट तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ठिकाणी मिळेल. हे शर्ट खूप स्टयलिश आणि आकर्षक दिसतात. या शर्टची किंमत साधारणपणे 5०० ते 6०० आहे.
लाइन शर्ट
बऱ्याच महिलांना लाइन शर्ट घालायला खूप आवडतात. या शर्टला खूप चांगला लूक देखील येतो. या शर्टमध्ये तुम्हाला अनेक रंग आणि पॅटर्न्स मिळतील. तुम्ही हा शर्ट क्रॉप टॉप, किंवा कोणत्याही स्टयलिश टॉपसह स्टाइल करू शकता.
मल्टी कलर शर्ट
तुम्हाला मल्टी कलर शर्टमध्ये देखील अनेक प्रकार आणि पर्टन्स मिळतील. हे शर्ट ऑफिससाठी बेस्ट आहेत. तुम्ही कोणत्याही जीन्स, स्कर्ट, ट्राऊजरसह हा शर्ट स्टाइल करू शकता.
या महत्वाच्या टिप्स लक्षात ठेवा
- तुम्ही अॅक्सेसरीजसह देखील शर्ट स्टाइल करू शकता.
- शर्टची फिटिंग आणि फॅब्रिक नीट तपासून घ्या.
हेही वाचा : Fashion Tips : साडी आणि सूटवर परफेक्ट लेटेस्ट स्टाइल ब्रेसलेट
Edited By : Prachi Manjrekar