हवामानातील बदलांमुळे तसेच त्वचेची योग्य काळजी न घेतल्याने त्वचा कोरडी पडते. त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. हिवाळ्यात थंड हवामानामुळे त्वचेतील ओलावा कमी होतो आणि त्यामुळे आपली त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. आता ही एक सामान्य झाली असून. या समस्यांकडे लक्ष दिले नाही तर आपली स्किन खराब होऊ शकते आज आपण जाणून घेऊयात कोणत्या तेलामुळे आपली ड्राय स्किन ग्लो करेल
तेलाचा हा परिणाम आपल्या त्वचेवर होतो
- थंडीत त्वचेवर तेल लावल्याने कोरडी आणि निस्तेज त्वचा ग्लो करते.
- तेल लावल्याने त्वचेला उष्णता मिळते. ज्यामुळे थंड हवामानात आराम मिळताे.
- हलक्या हाताने मसाज केल्यास रक्ताभिसरण सुधारते.
- ड्राय स्किनसाठी योग्य तेल निवडणे महत्त्वाचे आहे, जे त्वचेला मॉइश्चराइज करेल आणि नैसर्गिक ग्लो देईल.
नारळाच तेल
नारळाचं तेल हे त्वचेला खोलवरून हायड्रेट ठेवायला मदत करतात. यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरीचे गुणधर्म असल्याने त्वचेतील ड्रायनेस पूर्णपणे निघून जाते.
बादाम तेल
हिवाळ्यात त्वचेसाठी बादामाचे तेल उत्तम असते. बादाम तेलामुळे आपला चेहरा चांगल्या प्रकारे मॉइश्चरायझ होतो.
ऑलिव्ह ऑइल
ऑलिव्ह ऑइल त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते. त्यात अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. ऑलिव्ह ऑइलचे काही फायदे: कोरड्या त्वचेला आर्द्रता देते, त्वचेच्या मॉइश्चरायझेशनसाठी फायदेशीर
आर्गन तेल
आर्गन तेल हे व्हिटॅमिन E ने समृद्ध असते. हे तेल त्वचेतील ड्रायनेस कमी करून स्किन नैसर्गिकरित्या ग्लो करते.
तेल लावण्यापूर्वी या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा
- कोणत्याही तेलाचा पहिल्यांदा वापर करत असताना आधी हातांना लावून बघा.
- आठवड्यातून २ वेळा तुम्ही तेलाने मालिश करू शकता.
- तेल वापरण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती घ्या.
हेही वाचा : Winter Beauty Tips : स्किन मॉश्चराइज करण्यासाठी हे घरगुती उपाय करा
Edited By : Prachi Manjrekar