घरCORONA UPDATEशरीराच्या या भागापासून कोरोनाचा धोका सर्वाधिक, दुर्लक्ष करू नका

शरीराच्या या भागापासून कोरोनाचा धोका सर्वाधिक, दुर्लक्ष करू नका

Subscribe

संशोधकांचा दावा

कोरोना विषाणू पासून बचाव व्हावा म्हणून मास्क घालणे, वारंवार हात धुणे आणि सामाजिक अंतर ठेवणे असे निर्देश आरोग्य मंत्रालय, WHO कडून दिले गेले आहेत. काही लोक पृष्ठभागाशी थेट संपर्क येऊ नये म्हणून ग्लोव्ह्जचा वापर करत आहेत. मात्र एवढं करुनही आपल्या शरीराच्या एका भागापासून कोरोनाचा धोका सर्वाधिक आहे, असं संशोधकांनी म्हटलं आहे.

तुमच्या डोळ्यातून कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो असं संशोधकांनी म्हटलं आहे. नाक आणि तोंडाचं जेवढं संरक्षण करतो तेवढंच डोळ्यांचं संरक्षण करणं महत्त्वाचं आहे, असं संशोधकांनी म्हटलं आहे. द लॅन्सेट मासिकामध्ये याबाबतचं संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे. हा निष्कर्ष १६ देशांमधील लोकांवर केलेल्या १७० अभ्यासांच्या पुनरावलोकनावर आधारित आहे. डोळ्यांतून कोरोना विषाणूचा प्रसार देखील होऊ शकतो, असं जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने केलेल्या अभ्यासात म्हटलं आहे. अभ्यासामध्ये असं म्हटलं आहे की नाक आणि तोंड यांचं संरक्षण करणं जितकं महत्त्वाचं तितकंच डोळ्यांचं संरक्षण करणं महत्वाचं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुदत संपलेल्‍या १४,३१४ ग्रामपंचायतींवर प्रशासक बसवण्‍याचा निर्णय मागे घ्‍यावा – मुनगंटीवार


द लॅन्सेट डोळ्यांच्या संरक्षणासाठी व्हिझर, फेस शिल्ड, चष्मा किंवा मोठे चष्मा घालण्याची सूचना केली आहे. अमेरिकन अॅकॅडमी ऑफ ऑप्थामोलॉजीनुसार, सुधारात्मक लेन्स किंवा सनग्लासेस आपल्या डोळ्यांना संक्रमित थेंबापासून वाचवू शकतात. परंतु तरीही डोळ्याच्या चष्माच्या बाजू, वर आणि खालच्या बाजू खुल्ल्या असतील तर संक्रमित होण्याची शक्यता जास्त आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -