Thursday, December 7, 2023
घरमानिनीRelationship'हे' संकेत सांगतात समोरची व्यक्ती तुमची चुगली करतोय

‘हे’ संकेत सांगतात समोरची व्यक्ती तुमची चुगली करतोय

Subscribe

गॉसिप प्रत्येक ठिकाणी केली जाते. बहुतांशजणांना गॉसिप करणे आवडते. आपला फ्रेंन्ससर्कल असो किंवा नातेवाईकांबद्दलच्या काही गोष्टींवरुन गॉसिपिंग केले जाते. गॉसिप पासून दूर राहणे अशक्यच आहे. काही लोक आपला राग काढण्यासाठी समोरच्या व्यक्तीची चुगली करतो. याचा परिणाम असा होतो की, तुमचे त्याच्याशी नातेसंबंध बिघडले जातात.

रिलेशनशिप थेरेपिस्ट असे सांगतात की, गॉसिप अथवा चुगली ही एखाद्या व्यक्तीबद्दलच्या काही गोष्टी वाढवून-चढवून सांगितल्या जातात. अथवा चुकीच्या पद्धतीने सांगितल्या जातात. काही लोक तर अफवा पसरावी म्हणून ही गॉसिप करतात. मात्र असे केल्याने तुमचे व्यक्तिमत्त्व बिघडले जाते. अशातच जाणून घेऊयात राग व्यक्त करणे आणि गॉसिप करणे यामध्ये नक्की फरक काय आहे.

- Advertisement -

एक्सपर्ट्स असे मानतात की, एखाद्या व्यक्तीबद्दल मिर्च-मसाला लावून सांगत असेल आणि तुम्ही ते आवर्जुन ऐकता , हेच तिसऱ्या व्यक्तीला सांगतात त्याला गॉसिप असे म्हटले जाते. जर तुम्ही गॉसिप करत असाल तर व्यक्तीचे नाव आणि ओळख सांगून बोलू नये.

तसेच गॉसिपिंग करत असाल तर तो अशा व्यक्तीसोबत करू नका ज्यामुळे तुमचा राग अधिक वाढला जाईल. असे केल्यास तुम्ही तुमच्यासोबत झालेल्या गोष्टी सांगितल्या तर त्याला राग व्यक्त करणे असे मानले जाते. तुमच्यासोबत अशा काही गोष्टी होतात ज्या तुम्ही कोणाला शेअर करू शकत नाही. वेळीच तुम्ही त्या कोणाला सांगितल्या नाहीत तर तुमचा राग वाढला जातो. अशावेळी त्याला राग व्यक्त करणे म्हटले जाते.

- Advertisement -

मात्र जेव्हा एखादा व्यक्ती समोरच्या व्यक्तीचा पक्ष बदलण्याचा प्रयत्न करचतो तेव्हा त्याला गॉसिपिंग म्हणता येईल. असे मानूयात तुमचा मित्र एखाद्या मुद्द्यावर किंवा व्यक्तीबद्दल तुमच्यापेक्षा हटके मत देतो. जेव्हा तुम्ही त्याकडे इग्नोर करण्याऐवजी मित्राचे बोलणे सुधारण्याचा प्रयत्न करता अथवा त्याला तुम्ही जे म्हणत आहात ते मान्य करायला लावता त्याला गॉसिप नव्हे तर राग काढणे असे म्हटले जाते.


हेही वाचा- घरी आलेल्या पाहुण्यांचा स्वभाव असा ओळखा

- Advertisment -

Manini