भारतीय मसाल्यांमध्ये जिऱ्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपले पदार्थ जिऱ्याशिवाय पूर्ण होतंच नाहीत. फक्त मसाल्याचा स्वाद वाढवण्यासाठीच नाही तर जिरं हे शरीरासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे. जिरं दिसायला अतिशय लहान असलं तरी त्याचे फायदे मात्र खूपच आहेत. सतत 10 दिवस जिरं खाल्ल्यास याचे शरीराला खूप फायदे होतात.
जिरं खाल्ल्याने होतात ‘हे’ फायदे
- पचन सुधारते
जिरं खाल्ल्यामुळे जेवणाचं व्यवस्थित पचन होतं. पोटात दुखत असल्यास देखील जिरं खाल्ल्यामुळे पोटातील दुखणं कमी होण्यास मदत होते. गॅस आणि वाताचा त्रास असल्यास देखील जिऱ्यामुळं कमी होतो.
- त्वचा चांगली राहते
जिऱ्यामध्ये विटामिन-ई चे प्रमाण अधिक असल्यामुळे त्वचा तजेलदार ठेवण्यास मदत होते. शरीरात रक्त कमी असल्यामुळे चेहऱ्यावर येणारे मुरुम सुद्धा जिरं खाल्ल्यामुळे नाहीसे होतात.
- शरीरातील उष्णता कमी होते
शरीरामध्ये उष्णता असल्यास, जिरं खाल्ल्यामुळे कमी होते. रोज नियमित जिरं खाल्ल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. याशिवाय पाण्यात जिरं मिसळून उकळून पाणी प्यायल्यास, उष्णता कमी होऊन आराम मिळतो.
- उचकी थांबवण्यासाठी उपयोगी
जिऱ्याच्या पावडरमध्ये थोडंस व्हिनेगर टाकून मिक्स करून घ्यावं. ते चाटण खाल्ल्यास, उचकी थांबते. तर कच्चं जिरं खाल्ल्यास, अॅसिडीटीपासून लगेच सुटका होते.
- मधुमेह नियंत्रणात येते
दिवसभरात दोन वेळा पाण्यात जिऱ्याची पावडर घालून प्यायल्यास, मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. जिरे पावडरमध्ये गूळ मिक्स करून त्याचे गोळे करून खाल्ल्यास, मलेरियापासूनदेखील आराम मिळतो.