Friday, April 19, 2024
घरमानिनीHealthथायरॉईडवर रामबाण उपाय आहे 'हा' चहा

थायरॉईडवर रामबाण उपाय आहे ‘हा’ चहा

Subscribe

आपल्या शरिरात थायरॉइड ग्लँन्ड एक हार्मोन तयार करते ज्याच्या मदतीने मेटाबोलिज्म नियंत्राणात राहतो. जेव्हा हार्मोनचा स्तर फार कमी किंवा अधिक होते. तेव्हा शरिरात काही समस्या सुरु होतात. आयुर्वेदानुसार दररजो धण्याचा वापर करुन हार्मोन असंतुलित झाले असतील तर ते संतुलित ठेवण्यास मदत होईल. त्याचसोबत हायपोथायरायडिज्मचा प्रभाव ही कमी करण्यास फार मदत होऊ शकते.

अशातच आम्ही तुम्हाला धण्याची चहा कशी बनवायची याच बद्दल सांगणार आहोत. याच्या सहाय्याने तुम्ही शरिरात बिघडलेला थायरॉइडच्या स्तरावर उपचार करु शकता.

- Advertisement -

अशी बनवा धण्याची चहा
धण्याची चहा बनवण्यासाठी सर्वात प्रथम गरम पाणी घ्या. यामध्ये 1 चमचा रात्रभर भिजवलेले धणे टाका. असे केल्यानंतर तुम्ही ही चहा सकाळी गरम करा आणि गाळून घ्या. यामध्ये तुम्ही मधं सुद्धा टाकू शकता. आता अशा प्रकारची चहा दररोज सकाळी उपाशी पोटी प्या.

- Advertisement -

धण्याच्या चहामुळे रक्तातील शर्करा सुद्धा कंट्रोलमध्ये राहतो. तसेच धण्याची चहा ही थंड असते. या व्यतिरिक्त थंडीच्या दिवसात याचे सेवन रात्री सुद्धा करु नये.


हेही वाचा- Diabetes Control : मधुमेहाला नियंत्रित करतील कडुलिंबाची पानं

- Advertisment -

Manini