Wednesday, April 24, 2024
घरमानिनीRelationship'या' समाजात सर्व भावंड एकाच महिलेशी लग्न करतात

‘या’ समाजात सर्व भावंड एकाच महिलेशी लग्न करतात

Subscribe

महाराष्ट्रातील सोलापूर मध्ये जुळ्या बहिणींनी एकाच तरुणाशी विवाह केल्याचे प्रकरण फार चर्चेत आले होते. हिंदू मॅरेज अॅक्टमध्ये पहिली बायको जीवंत असताना दुसरे लग्न करु शकत नाही. यामुळेच त्या तरुणावर केस दाखल केली होती. परंतु वारंवार असा प्रश्न उपस्थितीत केला जात होता की, या तरुणींना काही प्रॉब्लेम नव्हता. अशातच असा एक समुदाय आहे जेथे बहुपत्नी असणे मान्य आहे. या समाजात एकच महिला एकाच घरातील भावंडांशी लग्न करुन घरात राहते.

जवळजवळ दोन वर्षांपूर्वी चीन मधील फुडान युनिव्हर्सिटीच्या इकनॉमिस्ट ये केंग एन्जी यांनी केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली होती. त्यांनी आपण बहुपतीत्वाची बाजू घेत असे म्हटले होते की, हा केवळ एकमेव मार्ग आहे ज्यामुळे सर्व चीन तरुणांचा विवाह होऊ शकतो. खरंतर सत्तरच्या दशकात वन चाइल्ड पॉलिसी आणल्यानंतर चीनमध्ये लैंगिक भेदभाव वाढला गेला. पालक मुलगा हवे म्हणून मुलींना मारुन टाकत होते. चीन मध्ये लैंगिक रेश्यो हा पू्र्णपणे विस्कटला गेला आहे. यामुळेच तेथील मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीयेत.

- Advertisement -

आता ऐवढ्या दशकांपासून लागू करण्यात आलेला नियम चीनने हटवला जरी असला तरीही याला फार उशिर झालाय. चीनमध्ये आता बहुतांश लोकसंख्या ही वृद्ध आहे. तेथे सेक्स रेश्यो सुद्धा बिघडला गेलाय. मुलींची संख्या कमी आणि मुलांचीच संख्या अधिक झाली आहे.

- Advertisement -

पण तुम्हाला माहितेय का, एका महिलेचे अनेक पती असल्याचा उल्लेख हा तिब्बेट मध्ये आढळतो. हा एक लहान देश असून जो दीर्घकाळापासून चीनची मनमानी सहन करत आहे. अशातच आयुष्य जगण्यासाठी त्यांच्याकडे अधिक काही नाही. बहुतांश लोक शेती करतात. जमिनीच्या लहान तुकड्यावरच आपल्या संपूर्ण परिवाराचे पालनपोषण करतात. या स्थितीत जर काही भावंड असलेल्या परिवारात सर्वांचे लग्न झाल्यास तर मुलं झाल्यानंतर त्या जमिनीचे लहान लहान हिस्से होतील.

असा एक तर्क सुद्धा लावला जातो की, नवरा जर कमवण्यासाठी किंवा खाण्यासाठी बाहेर जाणार असेल तर घराची देखभाल करण्याची जबाबदारी ही दुसरा नवरा घेऊ शकको. युनिव्हर्सिटी ऑफ नेब्रास्काने सत्तरच्या दशकापासून ते आतापर्यंत काही मानवशास्रांच्या हवाल्याने काही रिचर्स केले. त्यात असे समोर आले की, फॅमिली लॉ आणल्यानंतर बहुपतीत्व बेकायदेशीर झाले आहे. परंतु तिब्बेटीयन गावात हे अद्याप सुरु आहे.

या गावात परिवारातील भावंडांच्या लग्नाबद्दल घरातील मोठी मंडळीच सर्वकाही ठरवतात. तसेच त्यावेळी भावंडांमध्ये जमिनीवरु वाद होऊ नये याबद्दलच्या काही गोष्टी सु्द्धा आधीच स्पष्ट केल्या जातात. यामुळेच ते बहुपतीत्वाला मान्यता देतात.

याच दरम्यान मोठा भाऊ आणि होणारी वधू बसलेली असते. त्याचवेळी अन्य भाऊ सुद्धा तेथे उपस्थितीत असतात. लग्नाच्या सर्व विधी या मोठ्या भावासह पार पाडल्या जातात. अन्य भावंड ही तेथे साक्षीदार म्हणून असतात. परंतू घरात आल्यानंतर तिला सर्व भावंडांची पत्नी असेच म्हटले जाते. तसेच जरी एका भावाचा मृत्यू झाल्यास तर पत्नी ही विधवा होत नाही.

तसेच लग्नानंतर झालेली मुलं ही सर्व वडिल आपलेच असल्याचे मानतात. मुलं नक्की कोणापासू झाले आहे हे सामाजिक रुपात विचारले जात नाही. तसेच नव्या पीढीत सु्द्धा एकापेक्षा अधिक पुरुष असतील तर ही प्रथा पुढे सुरु राहते.


हेही वाचा- अहो आश्चर्य..जगात पहिल्यांदाच जन्माला आले तीन पालक असलेलं मूल

- Advertisment -

Manini