Tuesday, February 18, 2025
HomeमानिनीInnerwear Tips - टाईट इनरवेयरमुळे यीस्ट इन्फेक्शनचा धोका

Innerwear Tips – टाईट इनरवेयरमुळे यीस्ट इन्फेक्शनचा धोका

Subscribe

बॉडीटोन स्लिम दिसण्यासाठी अनेकजणी टाईट फिट ड्रेसेस घालतात. त्यामुळे पर्सनेलिटी आकर्षक दिसतेच तसेच चारचौघांवर प्रभावही पडतो. पण हे टाईट फिट परफेक्ट दिसण्यासाठी ड्रेसेसच्या आत टाईट इनरवेयर घातल्या जातात. ज्यामुळे यीस्ट इन्फेक्शनबरोबरच इतरही व्याधी होण्याची शक्यता असते. ज्याचे दिर्घ परिणाम भोगावे लागतात.

याचमुळे टाईट इनरवेयर न वापरण्याचा सल्ला डॉक्टर देतात. कारण ज्याप्रमाणे थंडीत त्वचा कोरडी आणि शुष्क होते तशीच उन्हाळ्यात घामामुळे वजायनल इंन्फेक्शनचा धोकाही वाढतो. यामुळे बाजारात मिळणाऱ्या आकर्षक टाईट सिंथेटीक पँटी न वापरता कॉटनच्या पँटी वापराव्यात. सिंथेटिक अंडरवेअर त्वचेला चिकटतात. परिणामी त्वचेवर घाम साचू लागतो आणि त्यामुळे संसर्ग होऊ शकतो. यातूनच यीस्ट इन्फेक्शन, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (यूटीआय) आणि योनीमार्गाचा संसर्ग होऊ शकतो.

रक्ताभिसरणावर परिणाम
टाईट अंडरवेअर नियमितपणे परिधान केल्याने रक्ताभिसरण प्रभावित होते, ज्यामुळे ऊतींचे नुकसान होण्याचा धोका वाढतो. ज्या महिला टाईट शॉर्ट्स वापरतात त्यांच्या मांडीच्या वरच्या भागात रक्तप्रवाह अनियमित होतो. याशिवाय चिडचिड, मुंग्या येणे किंवा बधीरपणा येतो. तसेच दिवसभर त्यांना अस्वस्थतेचे कारण ठरते.

हाय वॅस्ट टाईट पँटी
ज्या स्त्रिया हाय वॅस्ट टाईट पँटी घालतात त्यांना ओटीपोटात दुखणे आणि जडपणा येऊ शकतो. यामुळे, चिडचिड आणि ऍसिड रिफ्लक्सचा धोका वाढतो. टाईट इलास्टिकमुळे पोटाशी संबंधित समस्या वाढू शकतात. किंबहुना पोटावर दाब वाढल्याने पेटके आणि अपचनाचा सामना करावा लागतो.

जास्त काळ घट्ट अंडरवियर परिधान केल्याने वेजाइनल बॉयल येऊ शकतात, हे टाळण्यासाठी, कॉटन आणि सामान्य फिट पँटी वापराव्यात.

 

Manini