हिवाळ्यात तिळाचे पदार्थ खाण्याचे आरोग्यदायी फायदे ; वाचा रेसिपी

tilgul ladoo recipe
तिळगुळाचे लाडू

हिवाळा सुरु झाला की, वातावरणात कडाक्याची थंडी जाणवू लागते.त्यामुळे या थंडीमुळे सर्दी,खोकला असे अनेक आजार बळावत असतात. त्यामुळे अनेकजण हिवाळ्यात आपले शरीर सुदृढ राहण्यासाठी आपल्या आहारात बदल करतात म्हणजेच एकंदरीत संपूर्ण जीवनशैलीमध्येच बदल करतात.तसेच हिवाळ्यात अनेक उष्ण आणि पौष्टीक पदार्थ बनवण्याची आणि खाण्याची जय्यत तयारी सुरु असते. त्यात आता जानेवारी महिन्याला काहीच दिवस उरले असून, मकरसंक्रात या सणानिमित्त तीळगुळ बनवण्याची लगबग सर्वत्र पाहायला मिळते. या हंगामात तीळगुळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे असल्यामुळे ही परंपरा सुरु झाली.तीळामध्ये मुळत: उष्ण गुणधर्म असल्यामुळे ते शरीरासाठी आरोग्यदायी ठरते.अनेकजण हे तीळगुळ बनवण्यासाठी वेळ नसल्यामुळे हल्ली बाजारातून तीळगुळ विकत आणतात.मात्र जाणून घ्या कमीतकमी वेळात आणि सोप्या पद्धतीने कश्याप्रकारे हे तीळगुळ बनवतात.

 

साहित्य

 • अर्धा किलो तीळ
 • अर्धा किलो चिक्कीचा गुळ
 • १ ते २ चमचे तूप
 • १ ते दीड वाटी कुटलेले शेंगदाणे
 • १ चमचा वेलची पूड

 

कृती

 • प्रथम मंद आचेवर तीळ भाजून घ्या.
 • एखादे मोठे भांडे गॅसवर ठेवून त्यात चिक्कीचा गुळ आणि तूप घाला.
 • गुळाचा व्यवस्थित पाक तयार करुन घ्या.
 • पाक गोळीबंद झाल्यावर त्यात भाजलेले तीळ, दाण्याचा कूट वेळची पूड घाला .
 • मिश्रण एकजीव करुन,तीळगुळ वळून घ्या.
 • हाताला तूप लावल्यास लाडू वळताना हाताला चिटकत नाही.

हे ही वाचा – Health Care Tips : लाल केळ्यांच्या सेवनाने शरीर होतंय सुदृढ ; जाणून घ्या फायदे