Monday, April 22, 2024
घरमानिनीमुलांना मराठी की इंग्लिश शाळेत टाकायचं? कळतं नाहीये? मग वाचा

मुलांना मराठी की इंग्लिश शाळेत टाकायचं? कळतं नाहीये? मग वाचा

Subscribe

चंदा मांडवकर : 

सध्या बहुतांश पालक आपल्या मुलाचे आयुष्य सुंदर आणि सुरक्षित व्हावे यासाठी नोकरी करतात. यामध्ये सर्वाधिकँ महत्वाची गोष्ट अशी की, मुलाचे शिक्षण. कारण पालनपोषणाव्यतिरिक्त शिक्षण अशी ही एकमेव गोष्ट आहे जी त्याला आयुष्यात पुढे नेण्यास फार कामी येणार असते. अशातच तुम्ही तुमच्या मुलासाठी शाळेची निवड करतान काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्याचसोबत सध्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या वाढली आहे आणि सर्व पालक आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालतात. म्हणून तुम्ही सुद्धा तसे करावे का याचा प्रथम विचार करा. आज ही काही पालक आपल्या मुलांना मराठी माध्यमिक शाळांमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेतात. यामध्ये काहीही चुकीचे नाही. तर पाहूयात मुलांसाठी मुलांकरिता उत्तम शाळा आणि माध्यम निवडताना कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे त्याबद्दलच अधिक.

- Advertisement -

मराठी माध्यम की इंग्रजी ?

The Importance Of Understanding Parental Satisfaction

मुलांसाठी शाळेचे माध्यम योग्य निवडणे फार गरजेचे असते. कारण त्या शाळांमध्ये आपले मुल किती स्थिर राहिल हे फार महत्वाचे असते. सध्या इंग्रजी माध्यमात प्रवेश घेण्यापूर्वी बहुतांश शाळा पालकांना त्यांना किती उत्तम पद्धतीने इंग्रजी येते याबद्दल विचारतात. तसेच त्यांचे मुलं या माध्यमात खरंच योग्य आहे का यासाठी एक लहान चाचणी ही घेतात.

- Advertisement -

यामध्ये आणखी एक मुद्दा असा की, आर्थिक स्थिती मजबूत असलेले आणि दररोजच्या चालण्याबोलण्यात इंग्रजी भाषेचा वापर करणारे पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देऊ शकतात. यावेळी त्यांच्या मुलांना ही इंग्रजी मध्ये संभाषण करण्याची थोडी सवय झालेली असते.

याउलट काहीवेळेस अशी ही स्थिती उद्भवते की, पालकांना इंग्रजी येत नाही पण मुलाने इंग्रजी माध्यमातून शिकावे असे त्यांना वाटत असते. मात्र अभ्यासावेळी अशा मुलांची फार गैरसोय अशावेळी होते जेव्हा होमवर्क किंवा परिक्षा असतात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलाला नक्की मराठी की इंग्रजी माध्यमातून शिक्षण द्यावे की नाही याचा विचार करावा.

मराठी माध्यमातून अथवा मातृभाषेतून शिक्षण देणे सहज सोप्पे असते. कारण आपण ती भाषा आपल्या बोलण्याचालण्यात वापरतो. तिच भाषा आपले मुलं ही त्याच्या बालपणापासून ऐकतो आणि त्याला त्याची सवय होते. अशावेळी मुलाचा अधिक विचार करत त्याच्यासाठी कोणते माध्यम योग्य आहे हे पहावे. कारण मराठी माध्यमातून शिक्षण घेताना सुद्धा शाळेत इंग्रजी हा विषय असतोच. त्यामध्ये इंग्रजी बोलण्यास, लिहिण्यास शिकवले जाते. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलाला मराठी माध्यमात शिक्षण देताना अन्य कोणत्याही गोष्टींचा विचार करु नये. त्याचसोबत आपल्या आर्थिक स्थितीनुसार माध्यम निवडावे.

आता पाहूयात मुलांसाठी उत्तम शाळा निवडताना काय लक्षात ठेवावे?

Pandemic Pods" Are Fundamentally Reshaping K-12 Education | The Heritage  Foundation

  • शिक्षकांबद्दल जाणून घ्या

जर तुम्ही मुलाला शाळेत टाकण्याचा विचार करत असाल तर तेथील शिक्षकांबद्दल प्रथम जाणून घ्या. असे करणे का महत्वाचे आहे की, कारण तुम्ही तुमच्या मुलाचे भवितव्य त्यांच्या हातात देणार असता. त्याचसोबत शिक्षकांसाठी शाळा काय करते? शिक्षक व्यवस्थितीत शिकवतात किंवा मुलांशी ते कसे वागतात हे सुद्धा पहा.

  • फी बद्दल माहिती करुन घ्या

बहुतांश पालकांना असे वाटते की, महागड्या शाळांमध्ये उत्तम शिक्षण दिले जाते. त्यामुळे महागड्या शाळेत जरी तुम्ही मुलाला शिक्षणासाठी पाठवत असाल तरीही फी बद्दल काय सुविधा आहेत ते पहा. तर फी नुसार आणि तुमच्या आर्थिक क्षतमेनुसार शाळा निवडा.

  •  फीडबॅक जरुर घ्या

जेव्हा तुम्ही मुलाला एखाद्या शाळेत प्रवेश देऊ इच्छिता तेव्हा त्या शाळेबद्दलचा फीडबॅक जरुर घ्या.जसे की, त्या शाळेत शिकत असेला मुलगा अथवा त्याच्या पालकांना शाळेबद्दल अधिक माहिती विचारा. जेणेकरुन तुम्हाला शाळेबद्दल माहिती योग्य मिळेल.

  • तुमचे मुलं शाळेत जाण्यास सक्षम आहे का?

मुलाला शाळेत टाकण्यापूर्वी ते स्वत: त्यासाठी तयार आहे का हे पहा. कारण काही वेळेस असे होते की, पालक मुलांना शाळेत टाकतात पण तेथे गेल्यानंतर त्यांचे मन लागत नाही किंवा त्यांना रडायला येते. अशातच पालकांची जबाबदारी आहे की, आपले मुलं शाळेत जाण्यास सक्षम आहे का याचा विचार करावा.

  • शाळेचे ठिकाण

तुम्ही मुलासाठी जी शाळा निवडली आहे ती तुमच्या घरापासून किती दूर आहे याबद्दल जाणून घ्या. तसेच शाळा अंगदीच दूर असेल तर शाळेकडून स्कूल बसची सुविधा आहे की नाही याची माहिती काढा. जेणेकरुन जरी तुम्ही नोकरी करत असाल तरीही शाळेत जाण्यासाठी आणि येण्यासाठी मुलासाठी स्कूल बस असेल.

  • मुलाची सुरक्षितता

आपल्या मुलाने उत्तम शिकावे म्हणून आपण त्याला शाळेत टाकतो. परंतु मुलाच्या सुरक्षिततेबद्दल काय? त्यासाठी शाळेकडून काय उपाय करण्यात आले आहेत? जेव्हा घरातून एखादा मुलाला शाळेत आणण्यासाठी जातो तेव्हा त्यासाठी काय व्यवस्था आहे हे माहिती करून घ्या. कारण पालकांशिवाय तो इतर कोणासोबतच ही जाणार नाही. या व्यतिरिक्त सर्वाधिक महत्वाचे म्हणजे आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास शाळेत मेडिकल रुम किंवा अन्य सुविधा आहेत की नाही हे सुद्धा तपासून पहा.


हेही वाचा :

पालकांच्या भांडणात मुलांनी मध्यस्थी कशी करावी?

- Advertisment -

Manini