डिलिव्हरीनंतर बाळाची जबाबदारी पूर्णपणे आईवर येऊन पडते. बाळाची काळजी घेण्याच्या गडबडीत आपणही नुकतंच आई झालो आहोत, हे ती विसरून जाते. खरं तर, डिलेव्हरीनंतर आईच्या शरीरात बदल होतात. अचानक वजन वाढतं, शारीरिक बदल होतात आणि मूड स्विंग्स सुदधा होतात. त्यामुळे आपल्या बाळासह आईने स्वत:ची काळजी कशी घ्यायची यासंदर्भात काही टिप्स जाणून घेऊयात,
- डिलीव्हरीनंतर येणारा ताण तेवढा गांभीर्याने घेतला जात नाही. पण, असे करणे भविष्यात निर्माण होणाऱ्या एखाद्या गंभीर आजाराचे कारण ठरू शकते. त्यामुळे भावनिकदृष्ट्या मजबूत असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही डॉक्टर, कुटूंबीय, मित्र-मैत्रीणींशी बोलू शकता.
- बाळाच्या झोपेची जशी काळजी घेत आहात, त्याचप्रमाणे तुमची झोप पूर्ण होते का नाही? याकडे लक्ष द्यावे. किमान 7 ते 8 तासांची झोप घ्यावी.
- डिलीव्हरीनंतर शरीरात होणाऱ्या बदलांचा स्विकार करावा. काही महिलांचे वजन झपाट्याने वाढते, ज्याचा महिला खूप जास्त विचार करतात. पण, अशावेळी खरं तर नुकतंच आई झालेल्यांनी अशा विचार करायला हवा की, एका जीवाला या जगात आणण्याचे काम तुम्ही केले आहे, जे अद्वितीय आहे आणि आनंद राहायला हवे.
- वजन कमी करण्यासाठी तुम्ही डॉक्टरांच्या सल्लानुसार, व्यायाम, योगासने अशा अॅक्टिव्हिटी करू शकता. ज्यामुळे तुम्हाला पूर्वीची फिगर, वजन पुन्हा मिळेल.
- बाळाची काळजी घेताना काही महिलांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते, जे पूर्णपणे चुकीचे आहे. सकाळचा नाष्टा करायला विसरतात आणि थेट दुपारी जेवतात. पण, अशाने शरीरातील फॅट्स वेगाने वाढतात. त्यामुळे न्यु मॉमने कायम तीन तासांच्या अंतराने आहार घ्यायला हवा.
- जेवताना 32 वेळा घास चावून खाणे आवश्यक आहे. अशाने पचनक्रिया सुरळीत होईल आणि कंबरेखालील अवयवांमध्ये फॅट्स वाढण्याचे प्रमाण कमी होईल.
- डिलिव्हरीनंतर दिवसभरात तीन लिटर पाणी प्यायला हवे. शरीराचा 70% हिस्सा हा पाण्याने व्यापलेला आहे. त्यामुळे भरपूर पाणी प्या, जेणेकरून तुम्हाला डिहाड्रेशनचा धोका राहणार नाही.
- Advertisement -
- Advertisement -
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde