Monday, January 20, 2025
HomeमानिनीCoriander Farming : या पद्धतीने घरीच उगवा कोथिंबीर

Coriander Farming : या पद्धतीने घरीच उगवा कोथिंबीर

Subscribe

पदार्थाची चव वाढवण्यासाठी कोथिंबीर हमखास वापरली जाते. कोथिंबीरशिवाय अनेक पदार्थाची चव अपूर्ण मानली जाते. काही वर्षापूर्वी दोन रुपयांच्या मसाल्यात फ्री मध्ये मिळणाऱ्या कोथिंबीरचे आजचे भाव हे आता गगनाला भिडत आहेत. त्यामुळे अनेक महिला कोथिंबीर वापरणे सोडून देतात. पण, तुम्ही काही ट्रिक वापरल्या तर घरातच कोथिंबीर उगवू शकता. घरात पिकवण्यासाठी कोथिंबीर सर्वात सोपी असते. त्यामुळे जाणून घेऊयात, सोप्या पद्धतीने घरी कोथिंबीरची लागवड कशी करायची.

या पद्धतीने करा लागवड –

  • कोथिंबीरची लागवड करण्यासाठी सर्वाच आधी धणे एका प्लेटमध्ये घ्या.
  • धण्यांची वाटीच्या साहाय्याने किंवा लाटण्याने भरड करून घ्यावी.
  • तयार केलेली भरड कमीतकमी 12 तासांसाठी पाण्यात भिजत ठेवावी.
  • यानंतर एक कॉटन कपडा घ्या आणि धण्यातील पाणी काढून टाकावे.
  • धण्यातील पाणी काढून टाकल्यावर कापडाला घट्ट गाठ बांधून घ्यावी.
  • कपड्यासह धणे एका हवा बंद डब्यामध्ये ठेवावेत.
  • धण्यांचा हा डब्बा सुर्यप्रकाशात ठेवा. फक्त जास्त कडक उन्हात डब्बा राहणार नाही याची काळजी घ्यावी.
  • असे केल्याने दोन ते तीन दिवसात धण्यांना मोड येतील.
  • यानंतर मोड आलेले धणे मातीमध्ये मिक्स करून घ्यावेत.
  • आवश्यकतेनुसार पाणी घालण्यास विसरू नये.
  • कोथिंबीरमध्ये उगवलेले गवत नंतर काढून टाका.
  • रोपाची दररोज काळजी घ्यायला विसरू नका.
  • तुमची रोज वापरण्यास कोथिंबीर तयार झाली आहे.

 तुम्ही पुढील रोपे घरात लावू शकता –

पुदीना –

बारमाही वनस्पतीपैंकी एक म्हणजे पुदीना. पुदीना घरात लावण्यासाठी तुम्हाला एक चांगली प्रकाश असलेली जागा निवडावी लागेल.

बटाटा –

बटाटा अनेक जणांच्या आवडीची भाजी. बटाटा तुम्ही कंटेनर किंवा एखाद्या बकेटमध्ये लावू शकता.

मशरूम –

मशरूमची लागवड ओलसर कंटेनरमध्ये करू शकता.

याव्यतिरीक्त तुम्ही लिंबू , टोमॅटो, मिरचीची लागवड घरात करू शकता.

 

 

 

 

हेही पाहा –


Edited By – Chaitali Shinde

Manini