Tuesday, December 31, 2024
HomeमानिनीNeighbourhood : फ्रेंडली शेजारधर्म गरजेचा

Neighbourhood : फ्रेंडली शेजारधर्म गरजेचा

Subscribe

अडल्या नडल्यावेळी शेजारी मदतीला येतात. यामुळे शेजारधर्म नेहमी पाळावा असं आपणं नेहमी ऐकत असतो. पूर्वीच्या काळी शेजारधर्म पाळणे सोपेही होते. घर मोठी होती आंगण एक होती त्यामुळे घरातील सदस्य फावल्या वेळात एकमेकांबरोबर गप्पा मारून मनं मोकळं करायचे. त्यामुळे नकळत त्यांच्यात बॉंडींग तयार व्हायचे.

यातूनच मग अडीअडचणीत एकमेकांच्या मदतीला नातेवाईकांच्या आधी शेजारीचं धावायचे. पण मुंबई, पुणे नाशिक यांसारख्या शहरांमध्ये बैठ्या घरांची जागा सिमेंटच्या इमारतींनी घेतली आणि भिंतीबरोबर माणसंही विभागली गेली.एकटी पडली. त्यामुळे पूर्वीसारखे शेजाऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध कोणाचे फार राहीले नाही.

- Advertisement -

लिफ्टमध्ये किंवा मॉर्निंग वॉक करतानाच आता शेजारी किंवा बिल्डींगमध्ये ही व्यक्ती राहते हे कळतं. पण तज्ज्ञांच्या मते हा चुकीचा पायंडा पडला असून माणसांनी माणसांना भेटायला हवं व्यक्त व्हायलं हवं. त्य़ासाठी शेजारधर्मही पाळायला हवा. त्यासाठी काय करावं ते बघुया.

सुरक्षित

तज्ज्ञांच्या मते ज्यावेळी आपण शेजारी किंवा मित्रमैत्रिणींबरोबर असतो तेव्हा सुरक्षित वाटते. त्यांचा आधार वाटतो. प्रामुख्याने मेडीकल इमर्जन्सीवेळी.

- Advertisement -

भेटी गाठी

त्यासाठी नेहमी शेजारपाजाऱ्यांशी हसून खेळून राहावे. चांगले मैत्रीचे संबंध जोडावे.

सेलिब्रेशन

सणउत्सव किंवा घरातील कार्यक्रमांना शेजाऱ्यांना बोलवावे. त्यामुळे एकमेकाच्या खाण्यापिण्याच्या पद्धती आणि सवयी कळतात.

हस्तक्षेप करू नये

कोणत्याही नात्यामध्ये तेवढाच हस्तक्षेप करावा जेवढी गरज आहे. अन्यथा जर तुम्ही उठसुठ शेजाऱ्यांच्या लहानसहान गोष्टींमध्ये लुडबुड करू लागलात. तर संबंध बिघडू शकतात.

उसनवारी

बऱ्याच जणांना शेजाऱ्यांकडून उटसुठ काही ना काही उसन मागायची सवयचं असते. कधी साखर, कधी दूध तर कधी कांदे बटाटे, मिरच्या कोथिंबीर .जरी तुम्हीही हेच करत असाल तर ताबडतोब या सवयी थांबवा. त्यामुळे तुमचे संबंध ताणले जातील.

 

 

 

 


हेही पाहा –

- Advertisment -

Manini