Wednesday, April 10, 2024
घरमानिनीKitchenफ्रिजमध्ये फळं,भाज्या फ्रेश राहण्यासाठी वापरा हे सोपे उपाय

फ्रिजमध्ये फळं,भाज्या फ्रेश राहण्यासाठी वापरा हे सोपे उपाय

Subscribe

रोजच्या धावपळीत दररोज बाजारात जाऊन ताज्या भाज्या आणणे सगळ्यांनाच जमत नाही. मग अशावेळी वेळेची आणि पैशाची बचत व्हावी यासाठी आपण कमीत कमी आठवडाभर किंवा पंधरा दिवस पुरेल एवढ्या भाज्या फ्रिजमध्ये स्टोअर करतो. या भाज्या दीर्घकाळ हिरव्या आणि ताज्या राहाव्यात अशी आपली अपेक्षा असते. मात्र एक दोन दिवसातचं यातील काही भाज्या खराब होऊ लागतात. फळं पण सडू लागतात. यामुळे फायदा तर होत नाहीच मनस्ताप मात्र होतो. खरं तर भाज्या चुकीच्या पद्धतीने स्टोअर केल्यामुळे आणि नीट बघून न घेतल्याने हे नुकसान झालेलं असतं. जर तुम्हालाही याचा त्रास होत असेल तर आज आम्ही तुम्हाला हिरव्या भाज्या फ्रिजमध्ये ठेवण्यासाठी अतिशय सोप्या आणि उपयुक्त टिप्स सांगत आहोत. यामुळे भाज्या जास्त काळ ताज्या राहतील.

- Advertisement -

सर्वप्रथम बाजारातून भाजीपाला आणा, धुवून नीट वाळवल्यानंतरच फ्रीजमध्ये ठेवा. भाज्यांमध्ये थोडेसे पाणी असल्यास ते फ्रिजमध्ये लवकर खराब होऊ लागते.

हिरव्या पालेभाज्या कधीही धुवून फ्रीजमध्ये ठेवू नये, यामुळे भाज्या लवकर कुजतात.

- Advertisement -

फ्रिजमध्ये भाज्या ठेवण्यासाठी पॉलिथिन किंवा भाज्यांच्या पिशव्या वापरा.

ज्या पॉलिथिनमध्ये तुम्ही भाज्या ठेवत आहात त्यामध्ये 1-2 छिद्रे करा. असे केल्याने भाजी जास्त काळ टिकते.

फ्रिजच्या व्हेज बास्केटमध्ये काही वर्तमानपत्र किंवा कोणताही कागद पसरवा.

त्यात भाज्या एकामागून एक व्यवस्थित ठेवाव्यात .

त्यामुळे भाज्यातील पाणी कागदावर टिपले जाते.

भाज्या ताज्या राहतात

भाज्या आणि फळे कधीही एकत्र फ्रिजमध्ये ठेवू नयेत.

यामुळे दोन्ही गोष्टी लवकर खराब होऊ शकतात.

सर्व भाज्या पेपर, टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवाव्यात.

जर प्लास्टिकच्या पिशवीत ठेवत असाल तर ते चांगले हवाबंद करा. त्यामुळे अनेक दिवस भाजी खराब होत नाही.

हिरव्या पालेभाज्या लवकर संपवाव्यात

कारण हिरव्या भाज्या इतर भाज्यांपेक्षा लवकर खराब होतात.

जर तुम्ही कोणतीही भाजी कापली किंवा सोललेली असेल तर ती रेफ्रिजरेटरमध्ये पाण्याने भरलेल्या कंटेनरमध्ये ठेवा.

हिरव्या पालेभाज्या कापून ठेवण्यासाठी हवाबंद डब्यांचा वापर करा. त्यामुळे भाज्या लवकर खराब होणार नाहीत.

हिरवी धणे नेहमी हवाबंद बॉक्समध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशवीत ठेवावे, यामुळे धणे १५ दिवस ताजे राहतात.

 

- Advertisment -

Manini