Friday, January 3, 2025
HomeमानिनीRelationship Tips : पार्टनर सोबत मात्र लक्ष मोबाईलमध्ये

Relationship Tips : पार्टनर सोबत मात्र लक्ष मोबाईलमध्ये

Subscribe

मोबाईल, स्मार्टफोन बदलत्या लाइफस्टाइलचा एक अविभाज्य भाग झाला आहे. दिवसाची सुरूवात ते रात्री झोपेपर्यत लहानांपासून ते मोठ्यांपर्यत सर्वांच्याच हातात मोबाईल आहे. इतकचं काय तर, डेटवर गेलेले कपल्सही एकमेकांना वेळ देण्याऐवजी मोबाईलवर खेळताना तुम्ही सुद्धा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये पाहिले असतील. तुमच्याही बाबतीत असचं होत का? पार्टनरसोबत आहे पण, त्याचे लक्षमोबाईलमध्ये आहे. हे चित्र पाहून तळपायाची आग नक्कीच मस्तकात जात असेल. खरं तर, मोबाईलच्या व्यसनामुळे केवळ नात्यावरचं परिणाम होत नाही तर शारीरिक आजारही जडण्याची शक्यता असते.

नात्यावर होतोय परिणाम –

- Advertisement -

मोबाईलच्या व्यसनामुळे नात्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. उदाहरण द्यायचे झाल्यास, समजा तुम्ही एका रेस्टॉरंटमध्ये गेला आहात, तुमचा पार्टनर तुमच्याशी बोलायचे सोडून मोबाईल हाताळत असेल तर याने नात्यात दूरावा येऊ शकतो, नात्यात गैरसमज निर्माण होऊ शकतात. तुमच्यात अंतर पडू शकते.

मानसिक आरोग्य येते धोक्यात –

- Advertisement -

मोबाईलच्या सततच्या वापरामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. सतत मोबाईल स्क्रिन हाताळल्याने स्ट्रेस, डिप्रेशन येऊ शकते. त्यामुळे पार्टनर जर सतत मोबाईल हाताळत असेल तर तुम्ही त्याला या धोक्यांबाबत समजावू शकता.

या पद्धतीने काढू शकता मार्ग –

  • दोघांनीही एकमेकांना वेळ देताना काही नियम ठेवू शकता.
  • जेव्हा तुम्ही एकमेकांसोबत आहात तेव्हा फोन बंद ठेवायला हवे.
  • याव्यतिरिक्त एकमेंकासोबत असताना केवळ महत्त्वाचे कॉल्स घ्यावेत. आपला पूर्ण वेळ पार्टनरला द्यावा. यामुळे प्रेम अधिक वृद्धिंगत होईल.
  • भेटल्यावर तुमचा पूर्ण दिवस कसा गेला याबद्दल गोष्टी शेअर कराव्यात. यामुळे मोबाईलकडे लक्ष देण्याची गरज पडणार नाही.
  • भेटायला गेल्यावर सोशल मिडियावरील गोष्टींची चर्चा न करता तुमचे विषय बोलावेत, भविष्यातील प्लॅनिंग तुम्ही शेअर करू शकता.

अशाप्रकारे सोशल मिडियाच्या या आभासी दुनियेत न जगता पार्टनरसोबत आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यावा. यामुळे नात्यात गैरसमजाला थारा मिळणार नाही आणि दोघांमधील प्रेम दिवसेंदिवस वाढत जाईल.

 

 

 

 

हेही पाहा –


 

- Advertisment -

Manini